वड, पिंपळ लावणे काळाची गरज –नगराध्यक्ष प्रा. रत्नमाला भोयर

75

करोना महामारीच्या काळात ऑक्सिजन च्या अभावापायी कित्येक जनाचे जीव गेले. कृतीम ऑक्सिजन निर्मीती करावी लागली. भविष्यात ऑक्सिजन ची कमतरता भरून काढायची असेल तर प्रत्येकाचे कर्तव्य आहे की, ऑक्सिजन देणारे वड, पिंपळ, उंबर, कडुनिंब, पाकळ इ. चे वृक्षारोपण आपल्या परिसरात केले पाहिजे. भविष्यातील उपाययोजना म्हणून आपण आपल्या पाल्यांसाठी बॅकेत पैसे जमा करतो तद्वतच झाडे लावून पर्यावरण संवर्धन केले पाहिजे नाहीतर आपल्याला आपले वारस कदापी माफ करणार नाही. असे आवाहन भाजपा महिला आघाडी व जिजाऊ ब्रिगेड मुल तर्फे घेण्यात आलेल्या पर्यावरण दिन कार्यक्रमात नगराध्यक्ष प्रा. रत्नमाला भोयर यांनी केले.
प्रभाग 8 मधील नगरसेविका प्रभा चौथाले यांच्या सौजन्याने आयोजित कार्यक्रमात वार्डातील दोन ज्येष्ठ नागरिक श्री. भुरसे व श्री. निमगडे यांचा सत्कार करण्यात आला तसेच वड व पिंपळाचे झाडे रस्त्याचे कडेला व ओपन स्पेसमध्ये लावण्यात आले. नगराध्यक्ष प्रा रत्नमाला भोयर यांच्या अध्यक्षते खाली घेण्यात आलेल्या कार्यक्रमात भाजपा जिल्हा सरचिटणीस व जिजाऊ ब्रिगेड अध्यक्षा संजीवनी वाघरे, कार्यकर्ता अर्चना चावरे, कल्पना मेश्राम, लिना बद्देलवार, सारीका वासेकर, धोटेताई ,सुखदेव चौथाले ,उपस्थित होते.