कोरोना प्रादुर्भावाच्या काळात २८३ निराधारांना अध्यक्ष राकेश रत्नावार यांनी दिला संजय गांधी योजनेचा आधार

39

मुल- सध्याची परिस्थिती आर्थिक दृष्ट्या मोठी बिकट असून मागील तीन महिन्यांपासून लाकडाऊन मुळे गरीब असलेल्या निराधारांना कुणाचाही आधार नव्हता त्यामुळे त्यांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले होते आणि लाकडाऊन मुळे संजय गांधी निराधार योजना समितीची सभा घेता आली नाही त्यामुळे तालुक्यातील निराधारांचे २८३ अर्ज तहसील कार्यालयामध्ये आलेले होते. करिता दिनांक 15/06/2021 रोजी तहसिल कार्यालया,मूल येथे संजय गांधी निराधार योजना समितीची सभा बोलावून आलेले २८३ लाभार्थ्यांचे अर्ज राकेश रत्नावार यांच्या अध्यक्षतेखाली योजना समितीने मंजूर करुन तालुक्यातील निराधारांना आधार दिला आहे. मंजूर केलेल्या प्रकरणामध्ये इंदिरा गांधी विधवा योजना, संजयगांधी निराधार योजना, श्रावणबाळ वृध्दपकाळ योजना,सिकलसेलग्रस्त, घटस्फोटीत महिला व कोवीड-19 च्या प्रादुभावामुळे मृत्युपावलेल्या विधवा महिला असे एकूण २८३ प्रकरणे मंजूर करण्यांत आले. विशेष म्हणजे कोवीड मुळे मृत्युपावलेल्या कुटूंबातील विधवा महिलांनाही आर्थिक लाभ मिळवून देण्यासाठी समिती प्रयत्न करणार असल्याचेही ठरविण्यात आले आहे.

तसेच मूल तालूक्यातील सदर योजनेतील ग्रामीण भागातील लाभार्थ्यासाठी विशेष शिबीर आयोजीत करण्याबाबत निर्णय घेण्यांत आला. तसेच, संजयगांधी निराधार योजना व श्रावणबाळ वृध्दपकाळ योजनेत ज्या लाभार्थ्यांनी अर्ज सादर केलेले आहे परंतु, सदर प्रकरणात ज्याकांही त्रृटी आहेत त्या त्रृटया तात्काळ दुरूस्त्या करून विशेष सभा आयोजित करण्यांत यावे. जेणेकरून कोवीड-19 च्या प्रार्दुभावामुळे समितीची सभा आयोजित करण्यांस विलंब झालेला असून पुन्हा लाभार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागू नये याकरिता विशेष सभा आयोजित करण्यांत येऊन प्रकरणे मंजूरी करिता ठेवण्यांत यावे असा निर्णय घेण्यांत आलेला आहे. तसेच, संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष श्री.राकेश या.रत्नावार यांनी जास्तीत जास्त लाभार्थ्यांना फायदा होण्यांचे दृष्टीने प्रयत्नशिल आहेत. सदर योजने संबंधाने कांही अडचणी असल्यास तहसिल कार्यालयाचे कर्मचारी यांचेशी संपर्क साधुन कागदपत्राची पुर्तता करण्यांत यावी.

तरी सदर सभेला संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष, मा.राकेश या.रत्नावार, मा.पवार साहेब, नायब तहसिलदार,मूल तसेच, संजय गांधी निराधार योजना समितीचे सदस्य श्री.गंगाधर कुनघाटकर,सौ.रूपाली संतोषवार, सौ.अर्चना चावरे, श्री.सत्यनारायण अमदुर्तीवार, ,सदस्य तसेच, संजय गांधी निराधार योजनेचे संबंधित कर्मचारी श्री.गिरडकर आदी उपस्थित होते.