कृषी विभागाच्या वतीने कृषी संजीवनी सप्ताह

67

मुल – मुल तालुका कृषी अधिकारी कार्यालय अंतर्गत कृषी संजीवनी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे 21 जून ते 1 जुलै या सप्ताहात कृषी बीज प्रक्रिया ,जमीन आरोग्य पत्रिकेनुसार खतांचा संतुलित वापर रुंद वरंबा सरी,(बी.बी.एफ. लागवड एक गाव एक वाण, उपक्रम व विकेल ते पिकेल ,फळबाग लागवड आणि तंत्रज्ञान सहभाग पिकावरील कीड  व रोग नियंत्रनाच्या उपाययोजना इत्यादी बाबत शेतकऱ्यांना प्रत्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन करण्यात येत आहे. रुंद वरंभा सरी BBF लागवड पद्धतीने सोयाबीन पिकाची बेंबाळं येथील श्री. धनंजय उमरगुंडावार यांचे शेतात पीक प्रत्यक्षिकाचे आयोजन करून लागवड करण्यात आली. याप्रसंगी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बरहाटे यांनी शेतकऱ्यांना रुंद वरंभा सरी लागवड तंत्रज्ञान बाबत मार्गदर्शन केले तसेच तालुका कृषी अधिकारी प्रशांत कसराळे यानीही उपयुक्त माहिती समजाऊन सांगितले. तालुक्यातील भेजगाव येथील विजय लोनबले यांचे शेतातील भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत सधन आंबा लागवडीची पाहणी करून शेतकऱ्यांनी फळबाग लागवड करून आपले आर्थिक जीवनमान उंचावण्याबाबत बरहाटे यांनी सूचीत केले. कृषी संजीवनी सप्ताह यशस्वी करण्याकरिता मंडळ कृषी अधिकारी दीप्तन्शु तिजारे, पर्यवेक्षक प्रकाश पराते, श्री,पाटबजे, व प्रमोद खिल्लारी यांनी परिश्रम घेऊन सहकार्य केले.