सरकारी कर्मचारी व अधिकार्‍यांच्या सर्वसाधारण बदल्या 31 जुलैपर्यंत; पण 15 टक्केच

101

मुंबई न्यूज :  – महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या कमी झालेली असली तरी कोरोनाचा संसर्ग अद्याप कायम आहे. त्यामुळे आगामी काळात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची (corona third wave) शक्यता विचारात घेऊन राज्य सरकारने (Thackeray government) मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने प्रशासकीय बदल्यांना (Administrative Transfer) केवळ 14 ऑगस्ट 2021 पर्यंत परवानगी दिली आहे. 14 ऑगस्टनंतर कोणत्याही बदल्या करता येणार नाही, असे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. राज्य शासनाने दिलेल्या आदेशामध्ये केवळ विहित कालावधीत पूर्ण झालेल्या 15 टक्के मर्यादित सर्वसाधारण बदल्या (General transfer) करण्याचे निर्देश दिले आहेत. Big decision of Thackeray government ! Make general transfers of government employees and officials by July 31, but only 15 per cent

राज्य सरकारने दिलेल्या आदेशात म्हटले आहे की, सद्यस्थितीत महाराष्ट्र हे कोरोना बाधित राज्य आहे.
त्यामुळे तिसऱ्या लाटेची संभाव्य शक्यता लक्षात घेता बदली भत्त्यावरील खर्च मर्यादित करण्यात येत आहे. सर्वसाधारण बदल्या या एकूण कार्यरत पदांच्या 15 टक्के एवढ्या मर्यादेत बदली अधिनियमातील कलम 6 अन्वये सक्षम प्राधिकाऱ्याच्या मान्यतेने कराव्यात.
ज्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा संबंधित पदावर कार्यकाळ पूर्ण झाला आहे.
अशाच कर्मचाऱ्यांच्या बदल्या कराव्यात. या बदल्यांची कार्यवाही 31 जुलैपर्यंत पूर्ण करण्यात यावी.
यानंतर जी पदं रिक्त राहतील त्या पदांवर विशेष कारणास्तव बदली करण्यास 1 ऑगस्ट ते 14 ऑगस्ट काळात परवानगी असले.

विशेष कारणास्तव करावयाच्या बदल्या या एकूण कार्यरत पदांच्या 10 टक्के एवढ्या मर्यादेत करण्यात याव्यात. सर्वसाधरण बदल्या तसेच विशेष कारणास्तव बदल्या करताना नागरी सेवा मंडळाच्या
शिफारशी प्राप्त करण्याची व बदली अधिनियमातील सर्व तरतुदींचे पालन करण्याची दक्षता घ्यावी.
ज्या विभागांमध्ये बदलीची कार्यवाही करण्यासाठी संगणकीय प्रणाली (Online) पुर्णत: किंवा अंशत: विकसित केली आहे, अशा विभागांनी या प्रणालीचा वापर करावा, असे शासन आदेशात म्हटले आहे.