UIDAI Alert! तुमचं Aadhaar Card बनावट तर नाही ना? असं तपासा

60

नवी दिल्ली, 11 जुलै: आधार कार्डबाबत UIDAI ने विशेष अलर्ट जारी केला आहे. कोणताही 12 अंकी नंबर आधार कार्ड नंबर नसतो. सध्या कोणत्याही कामासाठी आधार कार्ड अनिवार्य झालं आहे. त्यामुळे आधारद्वारे होणारी फसवणूक (Aadhaar Fraud) रोखण्यासाठी UIDAI ने इशारा दिला आहे. ओळखपत्र म्हणून आधार कार्ड (Aadhaar Card) घेण्यापूर्वी कार्डधारकाची पडताळणी करणं आवश्यक आहे.

UIDAI ने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर याबाबत माहिती दिली आहे. सर्व 12 अंकी संख्या आधार नसते. व्यक्तीचा आधार कार्ड नंबर योग्य आहे की नाही यासाठी UIDAI च्या वेबसाईटवर वेरिफाय केलं जाऊ शकतं. तसंच mAadhaar App द्वारेही वेरिफाय करता येतं.

असं करा वेरिफाय –

आधार कार्ड वेरिफिकेशन (Aadhaar Crad Verification) ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने करता येतं. युजरला resident.uidai.gov.in/verify लिंकवर लॉगइन करावं लागेल. त्यानंतर 12 डिजिट आधार नंबर टाकावा लागेल. त्यानंतर सिक्योरिटी कोड आणि कॅप्चा कोड भरल्यानंतर Proceed To Verify वर क्लिक करावं लागेल. क्लिक केल्यानंतर 12 अंकी संख्या वेरिफिकेशन स्क्रीनवर दिसेल. हाच खरा आधार नंबर आहे.

 

अपडेशन –

आधार कार्डमध्ये आधार कार्डधारक केवळ दोन वेळा आपलं नाव अपडेट करू शकतो. त्याशिवाय आधार कार्डधारक आपल्या संपूर्ण आयुष्यात जन्मतिथी आणि लिंग केवळ एकदाच अपडेट करू शकतो.