प्रधानमंत्री पीकविमा योजनेत सहभागी व्हा – जिल्हाधिकारी Ø अंतिम मुदत 15 जुलैपर्यंत

66

योजनेत सहभागी होण्याची गुरुवार शेवटचा दिवस

शेतकर्‍यांच्या दृष्टीने अतिशय महत्वपूर्ण असलेल्या प्रधानमंत्री पीकविमा योजनेत सहभागी होण्याची मुदत लवकरच संपत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी जास्तीत जास्त संख्येने योजनेत सहभागी व्हावे आणि आपले पीक सुरक्षित व संरक्षित करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात प्रधानमंत्री पीकविमा योजना जिल्हास्तरीय आढावा समितीची सभा नुकतीच पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कृषी उपसंचालक रवींद्र मनोहरे, कृषी विकास अधिकारी जि.प. शंकर किरवे, जिल्हा अग्रणी बँक ऑफ इंडीयाचे व्यवस्थापक झा, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे व्यवस्थापक खिरटकर उपस्थित होते.
यावेळी अधिक माहिती देताना जिल्हाधिकारी म्हणाले, चंद्रपूर जिल्हय़ासाठी भारती एक्सा जनरल इंशुरन्स कंपनी लिमिटेडची नियुक्ती झाली असून ही योजना कर्जदार व बिगर कर्जदार शेतकर्‍यांसाठी ऐच्छीक आहे. योजनेत सहभागी होण्याची अंतिम दि. १५ जुलै २0२१ आहे. सर्व पिकांसाठी जोखीम स्तर ७0 टक्के असून पीक पेरणीपासून काढणीपयर्ंतच्या कालावधीत पिकाच्या उत्पादनात येणारी घट, पिकाच्या पेरणीपूर्वी, लावणीपूर्वी नुकसान, अपुरा पाऊस, हवामानातील इतर प्रतिकुल घटकामुळे अधिसुचित मुख्य पिकाची त्या भागातील सर्वसाधारण क्षेत्राच्या ७५ टक्के पेक्षा जास्त क्षेत्रावर पेरणी, लावणी होऊ शकली नाही तर विमा संरक्षण देय आहे. तसेच हंगामातील प्रतिकुल परिस्थितीत पूर, पावसातील खंड, दुष्काळ इ. बाबीमुळे शेतक-यांच्या अपेक्षित उत्पादनात ५0 टक्केहून अधिक काढणी पश्‍चात चक्रीवादळ, अवेळी पाऊस यामुळे कापणी, काढणी नंतर सुकवणीसाठी शेतात पसरवून ठेवलेल्या अधिसुचित पिकाचे नुकसान झाल्यास वैयक्तीक स्तरावर पंचनामे करुन नुकसान भरपाई दिली जाते, असेही त्यांनी सांगितले.
योजनेत सहभागी होण्यासाठी अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकासाठी पीक कर्ज घेतलेल्या शेतकर्‍यास सहभाग बंधनकारक नाही. मात्र त्यासाठी शेतकर्‍यांने विमा योजना भाग घेण्याच्या अंतिम दिनांक आधी किमान सात दिवस संबंधित बँकेस विमा हप्ता न भरणेबाबत लेखी कळविणे गरजेचे आहे. बिगर कर्जदार शेतक-याने आपला ७/१२ चा उतारा, बैंक पासबुक, आधार कार्ड व पीक पेरणीचे स्वयंम घोषणापत्र घेवून विमा हप्ता भरुन सहभाग घ्यावा. हप्ता भरलेली पोच पावती जपून ठेवावी किंवा (६६६.स्रेाु८.ॅ५.्रल्ल) याशासकीय विमा पोर्टलवर ऑनलाईन अर्ज भरावा, त्याची पावती लगेच मिळते. आपण नोंदविलेल्या मोबाईलवर रटर येतो, कॉमन सर्विस सेंटर (उरउ)आपले सरकारच्या मदतीने विमा योजनेत सहभागी होऊ शकतो.
नुकसान भरपाई मिळण्यासाठी नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाचे आकस्मात नुकसान झाल्यास ७२ तासाच्या आत याबाबत संबंधित विमा कंपनीस,संबंधित बँक, कृषि/महसुल विभाग किंवा विमा कंपनीचा टोल फ्री क्र.१८00१0३७७१२ यावर कळवावे, असे आवाहन केले. यावेळी जिल्हयातील सर्व तालुका कृषी अधिकारी, भारती अँक्सा जनरल इन्शुरंस कंपनीचे जिल्हा प्रतिनिधी पंकज कुशवाह आदी दुरदृष्यप्रणालीव्दारे उपस्थित होते.