आपले प्रस्ताव तत्काळ आणून द्यावे,असे आवाहन जिल्हा जात पडताळणी समितीचे उपायुक्त विजय वाकुलकर
चंद्रपूर :— सत्र 2020—21 मध्ये 12 वी विज्ञान शाखेमध्ये प्रवेशित असलेले आणि चालू सत्रात एमएचटी—सीईटी नीट,जेईई,एमबीए,बीएडच्या सीईटी देऊन व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ इच्छिणा—यांनी आॅनलाईन पध्दतीने सादर केलेला जात प्रमाणपत्र पडताळणीचा प्रस्ताव तात्काळ प्रत्यक्षात अथवा पोस्टाव्दारे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी कार्यालयास सादर करावा.
कोणीही विद्यार्थी यापासुन वंचित राहणार नाही,याची काळजी घेतली जाईल,आपले प्रस्ताव तत्काळ आणून द्यावे,असे आवाहन जिल्हा जात पडताळणी समितीचे उपायुक्त विजय वाकुलकर यांनी केले आहे.
Download