मूल येथे कारगिल विजय दिवस शहिदांना वाहिली आदरांजली : माजी सैनिकाचीही उपस्थिती

95

माजी सैनिकांचा शाल – श्रीफळ देऊन गौरव

मूल :— येथील मा. सा. कन्नमवार सभागृह सभागृह येथे 22 वा कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला. मूल तालुका छायाचित्रकार संघटना तसेच श्री साई मित्र परिवार यांचे संयुक्त विद्यमाने मा. सा. कन्नमवार सभागृह येथे २२ व्या कारगिल विजय दिन कार्यक्रमात बोलत होते. यावेळी मंचावर नायब तहसीलदार पृथ्वीराज साधणकर, मुख्याधिकारी सिद्धार्थ मेश्राम ,न. प. अध्यक्षा रत्नमाला भोयर, नगरसेवक विनोद कामडी,जीवन कोंतमवार, अभिजीत चेपूरवार,मंगलाताई चेपुरवार, डॉ. पूजा महेशकर, विजय सिद्धावार, अशोक येरमे, माजी सैनिक बाबा सुर, फुलचंद मेश्राम,पत्रकार व  नागरीक, विद्यार्थी उपस्थित होते.


        मुल नगरपरीषद अध्यक्षा भोयर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.यावेळी उपस्थित अतिथींना भारत—पाक कारगिल युध्दात शहीद झालेल्या जवानांच्या शौर्यगाथेला उजाळा दिला. तसेच शहिदांना आदराजंली वाहन्यात आली.सैनिकांच्या पराक्रमामुळेच देशात सर्व सुरक्षित आहोत.कारगिल युद्धात परिवाराला दुर सारून देशाला प्रथम प्राधान्य देणाऱ्या वीर जवानांना सलाम. हा विजय येणारी नवी पिढी कायम स्मरणात ठेवेल. सर्वांनी सध्या कोरोनाला आपला शत्रू समजून स्वयंस्फूर्तीने लस घेण्याचे आवाहन नगर परिषद मूलचे मुख्याधिकारी सिद्धार्थ मेश्राम यांनी केले
कार्यक्रमाच्या अध्यक्षा नगराध्यक्षा रत्नमाला भोयर यांनी देशसेवेत मूल तालुक्याने या देशाला अनेक सैनिक देश रक्षणाकरीता दिलेले असून याचा आम्हाला अभिमान आहे. देशासाठी बलिदान देणाऱ्या वीर जवानांचे येणाऱ्या नव्या पिढीला कायम स्मरण होत राहावे यासाठी मूल शहरात स्मारक उभारण्यात येणार असल्याचे प्रतिपादन केले.

यावेळी माजी सैनिकांचा उपस्थितांच्या वतीने सन्मानचिन्ह देवून जाहिर सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमात कलाशिक्षक भारत सलाम यांनी मंचावर सैनिकी जीवनावर आधारित चित्र रेखाटून उपस्थितांची मने जिंकली. रेखाटलेले चित्र नगर परिषद मूलला भेट देण्यात आले.

 

कार्यक्रमाचा यशस्वितेकरीता सचिन वाकडे, रुपेश कोठारे, विवेक मुत्यालवार, संदीप मोहबे, बंडु साखलवार, नितीन अलगुनवार, रितिक पोगुलवार, पिंटु पिंपळे, रोहित अडगुरवार, कुमुद भोयर, अभिजित चेपुरवार, महेश भुरसे, प्रविण गभणे, कलानिकेतन कला मंच यांनी परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचे संचालन सुजाता बरडे यांनी प्रास्ताविक अमित राऊत तर उपस्थितांचे आभार वासु यांनी मानले.