वाढविलेले शिक्षण शुल्क कमी करण्याच्या मागणीसाठी खाजगी शाळा पालक संघर्ष समितीने अनेकदा निवेदने देवून प्रशासनाचे लक्ष वेधले, यामुळे शाळेनी ठरविलेली शिक्षण शुल्क भरा अन्यथा शाळेतुन टिसी घेऊन जा. अशी धमकी शाळेकडून दिली जात आहेे. सदर धमकीमुळे पालकवर्गामध्ये असंतोष पसरलेला असुन स्वातंत्र्यदिना पासुन समितीच्या वतीने शाळेसमोर साखळी उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे.
कोरोना काळात शिक्षण शुल्क वाढवु नये असे शासनाचे आदेश आहेत. याशिवाय पुस्तक, नोटबुक, गणवेश घेण्याची सक्ती करू नये असेही आदेशात नमुद आहे, परंतु मूल येथील काही शाळांनी कोरोना काळातही मोठया प्रमाणात शिक्षण शुल्क वाढविलेले आहे. याबाबत खाजगी शाळा पालक संघर्ष समितीने निवेदनाव्दारे वाढविलेले शिक्षण शुल्क कमी करण्याची मागणी रेटुन धरली, उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर यांनी स्थानिक सर्व खाजगी शाळेच्या मुख्याध्यापकांची बैठक घेवून शिक्षणाधिकारी, चंद्रपूर यांच्या 19 एप्रिल 2021 च्या पत्राचे काटेकोरपणे पालण करण्याचे आदेश दिले, यावेळी काही शाळांनी शिक्षण शुल्क वाढविले नसल्याचे सांगीतले, प्रत्यक्षात माञ शिक्षण शुल्कांमध्ये भरमसाठ वाढ केल्याचे दिसुन येत आहे. वाढविलेले शिक्षण शुल्क कमी करण्याची मागणी खाजगी शाळा पालक संघर्ष समितीने केली असता, ज्या पालकांना शुल्क भरणे अडचणीचे आहे त्यांनी शाळेमधुन टिसी घेवुन जावे परंतु शिक्षण शुल्क कमी करणार नाही असा हेका काही शाळांनी धरला आहे. कोरोना काळात निर्माण झालेल्या आर्थिक परिस्थितीत शिक्षण शुल्क भरण्यासंबंधी पालकांना सक्ती न करण्याचे शासनाचे निर्देश आहेत. असे असताना काही शाळा शासन निर्देशाचे उल्लंघन करीत आहेत. ही कृती गैर आणि शासन निर्देशाची पायमल्ली करणारे असल्यामूळे सदर शाळेवर कारवाई करावी व वाढविलेले अवाजवी शिक्षण शुल्क कमी करावे. या मागणीच्या पुर्ततेसाठी स्थानिक पालक संघर्ष समितीने १५ आँगस्ट पासुन साखळी उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे. प्रशासनाकडून सदर शाळांवर कारवाई न झाल्यास पुकारलेले आंदोलन अधीक तिव्र केल्या जाईल असा इशारा पालक संघर्ष समितीचे प्रशांत समर्थ, किशोर कापगते, संजय भुसारी, गिरीश कांचनकर, अँड. ब्रम्हआझाद नागोशे, विवेक मुत्यालवार, राकेश ठाकरे, अजय गड्डमवार, संजय खोब्रागडे, मंगेश पोटवार, गौतम जिवणे, शैलेश वनकर, भोजराज गोवर्धन, महेश जेंगठे आदी पालकांनी दिला आहे.
Home आपला जिल्हा शाळेकडून पालकांना टिसी घेऊन जाण्याची धमकी समितीच्यावतीने शाळेसमोर साखळी उपोषणाला बसण्याचा इशारा