मुल येथे कृषी विभाग, महाराष्ट्र शासन तर्फे ‘रानभाज्या व रानफळे’ महोत्सवाचे सोमवार दि. ०९/०८/२०२१ ला सकाळी 11.०० वाजता

65

मुल येथे कृषी विभाग, महाराष्ट्र शासन तर्फे ‘रानभाज्या व रानफळे’ महोत्सवाचे
सोमवार दि. ०९/०८/२०२१ ला सकाळी 11.०० वाजता
* तालुका कृषी अधिकारी कार्यालय परिसरात आयोजन करण्यात आलेले आहे.


मूल (प्रमोद मशाखेत्री ):— : मागील वर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा दि. 9 ऑगस्ट 2021 कालावधीमध्ये तालुक्यात रानभाजी महोत्सव राबविण्यात येत आहे. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात रानभाज्या आढळून येत असल्याने तसेच रानभाज्या आरोग्याच्या दृष्टीने उपयुक्त असल्याने रानभाज्यांचे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचविणे व त्यातून आदिवासी शेतकऱ्यांना उत्पन्नाचे स्त्रोत मिळावे यासाठी मूल तालुका स्तरावर कृषी विभागाच्या वतीने रानभाजी महोत्सव राबविण्यात येत आहे. मुल येथे कृषी विभाग, महाराष्ट्र शासन तर्फे ‘रानभाज्या व रानफळे’ महोत्सवाचे
सोमवार दि. ०९/०८/२०२१ ला सकाळी 11.०० वाजता

तालुका कृषी अधिकारी कार्यालय परिसरात आयोजन करण्यात आलेले आहे.रानभाज्यांमध्ये कंदभाज्या जसे की, करांदे, कणगर, कडूकंद, कोनचाई, कडू इत्यादी भाज्या तर हिरव्या भाज्यांमध्ये तांदूळजा, काठेमाठ, कुडा, टाकळा, कोहळा, कुई, घोळ, कवळा, लोधा इत्यादी, फळभाज्यांमध्ये करटोली, वाघेडा,चिचुर्डी, पायार, मोह, कपाळफोडी, काकड इत्यादी तर फुलभाज्यांमध्ये कुडा, शेवळ व उळशी तसेच विदर्भातील तरोटा, कुड्याच्या शेंगा या रानभाज्यांची ओळख आरोग्याच्या दृष्टीने त्यांचे महत्त्व, पाककृती इत्यादी विषयी माहिती शहरी भागातील नागरिकांना तसेच ग्राहकांना होण्याच्या दृष्टिकोनातून रानभाजी महोत्सव आयोजित करण्यात येत आहे.
सर्व शेतकरी व ग्राहकांनी या रानभाजी महोत्सवाचा लाभ घ्यावा. तसेच महोत्सवाच्या अधिक माहितीकरिता तालुका कृषी अधिकारी कार्यालय, मूल कार्यालय यांच्याशी संपर्क करावा. असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे.