SBI Recruitment 2021 | बँकेत नोकरी शोधत असणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक नोकरी करण्यासाठी सुवर्णसंधी आहे. भारतातील सर्वात मोठी असणारी स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India) येथे भरती घेण्यात येणार आहे. SBI कडून 69 पदांसाठी ही भरती (SBI Recruitment 2021) घेण्यात येणार आहे. याबाबत SBI ने अधिसूचना (Notification) जारी केली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
पदे : एकूण जागा – 69
सहाय्यक व्यवस्थापक (Assistant Manager) – अभियंता (नागरी) : 36
सहाय्यक व्यवस्थापक (Assistant Manager) – अभियंता (इलेक्ट्रिकल) : 10
(Assistant Manager) – (मार्केटिंग आणि कम्युनिकेशन) : 4
उपव्यवस्थापक (Deputy Manager) : 10
रिलेशनशिप मॅनेजर (Relationship Manager) : 6
उत्पादन व्यवस्थापक (Production manager) : 2
मंडळ संरक्षण सल्लागार (Board Defense Advisor) : 1
शैक्षणिक पात्रता :
सहाय्यक व्यवस्थापक – अभियंता (नागरी) – उमेदवाराकडे सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये 60 टक्के गुणांसह पदवी.
सहाय्यक व्यवस्थापकासाठी – अभियंता (इलेक्ट्रिकल) – उमेदवाराकडे 60 टक्के गुणांसह इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी पदवी.
Assistant Manager (विपणन आणि संप्रेषण) – उमेदवाराकडे मान्यताप्राप्त संस्थेतून MBA / PGDM अथवा समकक्ष पदवी.
उपव्यवस्थापक – उमेदवाराकडे MBA/PGDM अथवा कृषी-व्यवसाय MBA/PGDM पदवी.
रिलेशनशिप मॅनेजर – उमेदवाराकडे मान्यताप्राप्त संस्थेकडून मार्केटिंगमध्ये MBA / PGDM स्पेशलायझेशनसह BE / BTech पदवी.
सर्कल डिफेन्स अॅडव्हायझर – उमेदवार भारतीय सेनेतून निवृत्त मेजर जनरल किंवा ब्रिगेडियर असावा, किंवा भारतीय नौदल किंवा हवाई दलातील समकक्ष पद असावा.
महत्वाची तारीख : 13 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर 2021
अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाइट : www.sbi.co.in
सविस्तर माहितीसाठी : sbi.co.in/web/careers