नदीत अंघोळीसाठी गेलेल्या पाच तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू !

191

नागपूरमधून(Nagpur) एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. अंघोळीसाठी कान्हान नदीत उतरलेल्या पाच तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना सकाळच्या सुमारास घडली आहे. यवतमाळ मधील दिग्रसमध्ये राहणाऱ्या 12 तरुण अम्मा दर्गा येथे दर्शनासाठी गेले असता सकाळाच्या सुमारास हे सर्व तरुण अंघोळीसाठी नदी पात्रात उतरले आणि पाण्याचा अंदाज न आल्याने यातील 5 युवक बुडाले आहे. माहितीनुसार या तुरुणांचे मृतदेह अद्याप सापडले नसून शोधकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. तसेच स्थानिक पथकाने एसडीआरएफ पथकाची मागणी केली असून नदीचा प्रवाह जास्त असल्याने शोधकार्य करण्यास अडचण येत असल्याचे कळतेय. यामुळे पारशिवणी येथील तहसीलदारांनी एसडीआरएफ नागपूरचे पथक पाठवावे आशी मागणी केली आहे.(5 People Drown At Kanhan River Nagpur)

नदीत उतरण्याचा मोह न आवरल्याने तसेच तरुणांना नदीचा प्रवाहाचा अंदाज आला नसल्याने तरुणांना आपला जीव गमवावा लागला आहे. बुडालेल्या पाच तरुणांचे वय 18 ते 22 वर्ष वयोगाटातील आहेत.मृत तरुणांची ओळख पटली असून सय्यद अरबाज (२१), ख्वाजा बेग (१९), सप्तहीन शेख (२०), अय्याज बेग (२२), मो आखुजर (२१) अशी त्यांची नावं आहे. हे पाचही युवक दिग्रस येथील आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले आहेत. तसेच या संपूर्ण घटनेमुळे स्थानिकांमध्ये दुखाचे वातापरण निर्माण झाले असून अनेक नागरिका पोलिसांची मदत देखील करत आहे.