माझी वसुंधरा अभियान २.० अंतर्गत नगर परिषद मुल तर्फे “पर्यावरण स्नेही बाप्पा” स्पर्धेचे आयोजन

51

नगर परिषद मुल   पर्यावरण स्नेही बाप्पा
माझी वसुंधरा अभियान २.० अंतर्गत नगर परिषद मुल तर्फे “पर्यावरण स्नेही बाप्पा” स्पर्धेचे आयोजन केले आहे. या अंतर्गत मुल शहरातील फक्त घरगुती बसलेल्या गणपतीं उत्सवाचा समावेश करण्यात आला आहे. या अंतर्गत भाग घेणाऱ्या नागरिकांनी खाली देलेल्या अटी व शर्ती यांची पूर्तता करणे गरजेचे आहे.भाग न घेणाऱ्यानी सुद्धा या अटी व शर्तीची पूर्तता करावी. या स्पर्धेत भाग घेणाऱ्यानी प्रमाण म्हणून फोटो स्वरुपात नगर परिषद मुल कार्यालयातील आरोग्य व पाणी पुरवठा विभागात जमा करावी.

अटी व शर्ती
१-गणेश मूर्ती हि फक्त मातीची किवा शाडूची मातीची तयार केलेली असावी.पीओपीपासून तयार झालेल्या गणेश मूर्ती वापरू नये.
२-सजावटी साठी वापरली जाणारी सामग्री हि फक्त नैसर्गिक व हरित वापरावी.
३-सजावट करताना थर्माकॉल व प्लास्टिकचा वापर पूर्णपणे टाळावा.
४-गणेशउत्सवा दरम्यान घरात निर्माण होणाऱ्या निर्माल्याचा वापर हरित खत निर्मितीसाठी वापर केलेला असावा .
५-गणेश मूर्तीचे घरात किवा नगर परिषदने उपलब्ध करून दिलेल्या कृत्रिम तलावात विसर्जन करावे. त्यामुळे मुल शहरातील नदी व तलाव जलप्रदुषणं पासून मुक्त राहतील.
६-घरीच मूर्ती विसर्जन झालेल्या मूर्तीची माती इकडे झाड लावण्यासाठी वापर करू शकता किवा घरी असलेल्या कुठल्याही झाडामध्ये वापर करू शकता.
७-माझी वसुंधरा अभियान अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या हरित शपथ प्रमाणपत्र असावे.

‘पर्यावरण स्नेही बाप्पा’ या अभियान अंतर्गत भाग घेणाऱ्या स्पर्धकांचा सर्व डाटा हा फोटो स्वरुपात असावा आणि तो २० सप्टेंबर ते २५ सप्टेबर २०२१ या दरम्यान जमा वर नमूद केलेल्या विभागात जमा करावे. भाग घेणाऱ्या प्रत्येक स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येईल व पहिल्या ३ स्पर्धकांना प्रोत्साहनपर चिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येईल.स्पर्धेत मुल शहरातील जास्तीजास्त नागरिकांनी सहभाग घ्यावा.