आनंदवनचा मूल येथे मिशन आनंद सहयोग उपक्रम जीवनावश्यक किटचे वाटप
महारोगी सेवा समिती वरोरा च्या माध्यमातून कोरोना काळात उध्दवस्त झालेल्या आणि आर्थिक झळ पोहचलेल्या कुटूंबियांना” मिशन आनंद सहयोग ” या उपक्रमा अंतर्गत जीवनाशक वस्तूंच्या किटचे वाटप मूल येथील नवभारत कन्या विद्यालयात करण्यात आले.
शोध विचार वेद बहुउद्देशीय संस्था मूळ चे अध्यक्ष गौरव श्यामकुळे यांनी मूल तालुक्यातील जनतेला लाभ देण्याची विनंती केली होती. त्या अनुषंगाने नवभारत विद्यालय मूल येथे एक छोटेखाणी कार्यक्रम घेऊन त्यात तालुक्यातील जवळपास 150 कुटूंबियांना एक परिपूर्ण आवश्यक अशी अन्नधान्याची किट उपलब्ध करून दिली.
त्यात तांदूळ, आठा, तेल, साबण, लोणचे, डाळ, बिस्कीट, तिखट ,मीठ आणि अन्य जीवनावश्यक अशा तीस वस्तूंची किट वाटप करण्यात आली.
यावेळी महारोगी सेवा समितीचे पदाधिकारी रवींद्र नलगठीवार ,ईकराम पटेल, शौकत खान उमेश घुलवसे,अश्विनी आंदळकर, झाबिया खान, सामाजिक कार्यकर्ते विजय सिद्धावार, मंगेश पोटवार, पत्रकार भोजराज गोवर्धन ,नवभारत विद्यालयाच्या मुख्याध्यापक सौ. सूनकरवार , समीर अल्लूरवार,पत्रकार अमित राऊत, सामाजिक कार्यकर्ते राजू सुत्रपवार,प्रणय डागमवार, प्रशिक दुर्गे, युगल मानकर, प्रशांत वाडके, आनंदराव गोहणे, किसन गुरूनुले तसेच अन्य युवा कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळेस किट घेतल्यानंतर मिळालेल्या सहयोगाबद्दल उपस्थित कुटूंबियांनी महारोगी सेवा समितीच्या उपक्रमाबद्दल आणि सहयोगाबद्दल समाधान व्यक्त केले.