गडीसुर्ला येथे संेद्रिय खत प्रकल्पाचे उद्घाटन

42

गडीसुर्ला येथे संेद्रिय खत प्रकल्पाचे उद्घाटन
मूल:- तालुक्यातील गडीसुर्ला येथे महाराष्ट्र राज्य गा्रमीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत राष्ट्रीय ग्रामीण आर्थीक परिवर्तन प्रकल्प व सखी महिला ग्रामसंघ यांच्याव्दारे स्थानिक सेंद्रिय गटाच्या पुढाकाराने गडीसूर्ला येथील ग्रामपंचायत कार्यालयात सेंद्रिय डेमो युनिटचे उद्घाटन संवर्ग विकास अधिकारी मयूर कळसे यांच्या हस्ते करण्यात आले.


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका कृषी अधिकारी गायकवाड तर प्रमूख पाहूणे म्हणुन मंडळ कृषी अधिकारी तिजारे.पंचायत समिती चे कृषि अधिकारी सुनिल कारडवार,चैधरी,कृषि विस्तार अधिकारी पेठकर,पाटील,ग्रामविकास अधिकारी खोब्रारागडे सरपंच वाडके,तुलसी प्रभाग संघाच्या अध्यक्षा सुवर्णा आकानपल्लीवार आदी उपस्थित होते.यावेळी गायकवाड यांनी शेतक-यांना विविध योजनांचा लाभ कसा मिळवता येईल,यावर सविस्तर माहिती दिली. तालुका अभियान व्यवस्थापक माया सुमटकर यांनी मार्गदर्शन करताना शेतीमध्ये रायायनिक खते आणि कीटकनाशकांचा अतिरेकी वापर केल्याने आज जीवघेणे आजार वाढले आहेत.

 

स्ेंद्रिय शेती करून शेतीला विषमुक्त करू या यासाठी धरती स्थानिक गट गडीसुर्लाअंतर्गत प्रभागातील शेतक-यांना सेंद्रिय निविष्ठा उदा.गंाडूळ खत,कंपोस्ट खत,लेंडीखत,धनजीवामृत,जीवामृत,वेस्ट डी कंपोजर,दही अर्क,ब्रहमास्त्र,अग्नीअस्त्र,उपलब्ध करून दिल्या जाईल,असे सांगितले चैधरी यांनीसेंद्रिय डेमो युनिटमध्ये उपलब्ध वस्तुंना कशी बाजारपेठ मिळवता येईल,या संदर्भात उपस्थितांना मार्गदर्शन केले.

तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष मूल येथून तालुका व्यवस्थापक प्रकाश तुरनकर,निलेष जीवनकर,स्नेहल मडावी,जयश्री कामडी,रूपेश आदे,अमर रंगारी,हेमचंदबोरकर,सोपनकर,मयूर गडमवार,आदी उपस्थित होते.
संचालन दीक्षा मोहूर्ले यांनी केले.प्रास्थाविक सोनाली शेंडेतर उपस्थितांचे आभार हेमलता बुटले यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता चंदा मोहूुर्ले,मीना कावळे.तेजस्विनी ंिशंदे,सुमन येनुरकर,निलोफर शेख,सीमा आंबडकर,वैशाली आंबेडकर,मनीषा रापेलीवार व महिला ग्रामसंघाच्या सदस्यांनी सहकार्य केले.