मोबाईल नंबर लिंक नसला तरी Aadhaar Card डाऊनलोड करता येईल; अशी आहे सोपी प्रोसेस

50

नवी दिल्ली, 23 सप्टेंबर : युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी इंडियाकडून (UIDAI) भारतीय नागरिकांना दिलेले आधार कार्ड (Aadhaar Card) सध्याच्या काळातील एक अतिशय महत्त्वाचे कागदपत्र बनले आहे. तुमच्या फोनचे सिमकार्ड घेण्यापासून पासपोर्ट मिळवण्यापर्यंत, बँक खाते उघडण्यापासून ते आयटीआर दाखल करण्यापर्यंत आणि ड्रायव्हिंग लायसन्स (डीएल) मिळवण्यापासून ते पॅन कार्ड काढण्यासाठी देखील गरजेचे आहे. जर तुमचा मोबाईल क्रमांक आधारशी नोंदणीकृत असेल तर अनेक गोष्टी खूप सोप्या होतात. तुम्हाला अचानक आधार कार्ड हवे असेल तर तुम्ही ते लगेच ऑनलाईन डाउनलोड करू शकता. आता मोबाईल क्रमांक आधारशी जोडला गेला नाही तर अनेक कामे अडकू शकतात.

मात्र, काळजी करू नका कारण आता असे होणार नाही. UIDAI च्या अधिकृत वेबसाइटनुसार, तुम्ही तुमचा मोबाईल नंबर नोंदणी केल्याशिवाय आधार कार्ड डाउनलोड करू शकता. यासाठी तुम्हाला UIDAI च्या वेबसाइटवर लॉग इन करावे लागेल. त्याची प्रक्रिया देखील खूप सोपी केली आहे.

ज्यांच्याकडे स्मार्टफोन नाही त्यांच्यासाठीही आधार सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ऑफलाइन सेवा केवळ नोंदणीकृत मोबाईल नंबरवरून एसएमएस पाठवल्यावर उपलब्ध होईल. नोंदणीकृत मोबाईल क्रमांकाशिवाय आधार कसे डाउनलोड करावे 1. सर्वप्रथम UIDAI च्या अधिकृत वेबसाइट uidai.gov.in वर जा.

2. मुखपृष्ठावरून ‘my aadhar’ मध्ये दिलेल्या ‘Order Aadhaar Reprint’ वर क्लिक करा. 3. तुमचा 12 अंकी आधार क्रमांक किंवा 16 अंकी VIDN किंवा 28 अंकी नावनोंदणी आयडी प्रविष्ट करा.

नंतर सुरक्षा कोड प्रविष्ट करा. ‘My Mobile number is not registered’ वर क्लिक करा.

5. नंतर तुमचा पर्यायी क्रमांक किंवा नोंदणीकृत नसलेला मोबाईल क्रमांक टाका. 6. त्यानंतर ‘OTP send’ वर क्लिक करा आणि ओटीपी प्रविष्ट केल्यानंतर सबमिटवर क्लिक करा.

7. नंतर पेमेंट पर्याय निवडा. नंतर पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी डिजिटल स्वाक्षरी सबमिट करा. 8. सेवा विनंती क्रमांक (SRN) SMS द्वारे तयार केला जाईल.

याद्वारे तुम्ही स्टेटस ट्रॅक करू शकता.  नवीन पीव्हीसी आधार कार्डसाठी अर्ज कसा करावा यूआयडीएआयने प्रत्येकाच्या कार्डची सुरक्षा लक्षात घेऊन आधार पीव्हीसी कार्ड (Aadhaar PVC) सुरू केले आहे. यामुळे, कोणताही वापरकर्ता प्राधिकरणाच्या वेबसाइटद्वारे नवीन पीव्हीसी कार्ड मागवू शकतो. नवीन पीव्हीसी आधार कार्ड सोबत नेणे खूप सोपे आहे.