अहिंसेचे पुजारी महात्मा गांधी व जय जवान जय किसान असा नारा देणारे लालबहाद्दूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त नगर परिषद येथे व गांधी चौकात प्रतिमेला मालार्पण करून मुल च्या नगराध्यक्षा प्रा. रत्नमाला भोयर सर्व मूलवासीय जनतेला शुभेच्छा दिल्यात.
आज स्पर्धेच्या युगात पुढे जाण्यासाठी प्रत्येक जण हिंसक होत चालला आहे तेव्हा आपल्यायला महात्मा गांधी यांचे अहिंसेचे विचार आपल्यात अंगिकारणे आज काळाची गरज आहे.
लाल बहादूर शास्त्री यांनी सीमेवर लढणार्या जवानाना व अन्न देणार्या शेतकरी चे आपल्या जीवनात महत्त्व पूर्ण स्थान आहे
म्हणून जवान आणि किसान यांचा आपण मान राखला पाहिजे मुल च्या नगराध्यक्षा प्रा. रत्नमाला भोयर असे सांगितले.
कार्यक्रमास उपाध्यक्ष नंदकिशोर रणदिवे, बांधकाम सभापती प्रशांत समर्थ, नगरसेवीका प्रभा चौथाले, नगरसेवीका वंदना वाकडे, नगरसेवीका विद्या बोबाटे, सह न.प.कर्मचारी उपस्थित होते.