असंघटित कामगारांसाठी ई-श्रम पोर्टल,दोन लाखांच्या ‘या‘ सुविधेसह इतर फायदे,जाणून घ्या……………..

47

असंघटीत क्षेत्रातील कामगारांसाठी सरकारने ई-श्रम पोर्टल सुरू केले आहे.प्रत्येक कामगाराची नोंद या
पोर्टलच्या माध्यमातून ठेवली जाईल.

जवळपास असंघटीत क्षेत्रातील कामगारांना 12 अंकी युनिव्हर्सल
अकाऊंट नंबर (यूएएन) आणि ई-श्रम कार्ड दिले जाईल,जे देशभरात वैद्य असेल.

12 अंकी मिळेल युनिव्हर्सल नंबर

                                 केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्रालय जवळपास असंघटीत कामगारांसाठी 12 अंकी युनिव्हर्सल अकाऊंट नंबर जारी करेल.यामुळे केवळ कल्याणकारी योजनांची पोर्टेबिलीटीच नव्हे तर संकटाच्या वेळीअनेक फायदेशीर योजनांचा फायदा सुध्दा कामगारांनामिळू शकेल.

अपघाती विम्याची सुविधा
एखाद्या कामगाराने ई-श्रम पोर्टलवर नोंदणी केल्यास त्याला दोन लाख रूपयांच्या अपघाती
विम्याचा लाभ मिळेल.यामध्ये सरकारकडून एक वर्षाचाप्रीमियम दिला जाईल.नोंदणीकृत कामगार अपघातात
मृत्यू झाल्यास किंवा संपूर्ण अपंगत्व आल्यास त्यंानादोन लाख रूपये मिळण्याचा हक्क असेल.दरम्यान,
अंशतः अपंग झाल्यास विमा योजनेअंतर्गत एक लाख रूपये दिले जातील.