पीएसए ऑक्सीजन प्लाँट कोर्सकरिता एनटीसी(आयटीआय) फिटर, वेल्डर, इलेक्ट्रिशन, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक आदी ट्रेड पात्र उमेदवारांना

80

 पीएसए ऑक्सीजन प्लाँट कोर्सकरीता उमेदवारांना अर्ज सादर करण्याचे आवाहन

चंद्रपूर दि. 3 डिसेंबर : राज्यामध्ये कोविड-19 या साथीच्या आजारावरील रुग्णांवर उपचार करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या पॅरामेडिकल क्षेत्रातील प्रशिक्षित मानव संसाधनाची निर्मिती करण्याकरीता व कौशल्य प्रशिक्षणाची निगडित पॅरामेडिकल क्षेत्रातील कुशल मनुष्यबळ तयार करण्याकरीता उपजिविकेसाठी कौशल्य संपादन व ज्ञान जागरुकता अभियान राबविण्यात येत आहे.

या अभियानातंर्गत कॅपिटल गुडस मॅन्युफॅक्चरींग सेंटर स्किल कौन्सिलमधील ऑपरेशन अँड मेंटेनन्स ऑफ पीएसए ऑक्सीजन प्लाँट कोर्सकरिता एनटीसी(आयटीआय) फिटर, वेल्डर, इलेक्ट्रिशन, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक आदी ट्रेड पात्र उमेदवारांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, चंद्रपूर येथे प्रशिक्षण देण्याचे नियोजित आहे.

 तरी, ईच्छूक पात्र उमेदवारांनी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, प्रशासकीय इमारत पहिला माळा, हॉल क्रमांक 5/6 या कार्यालयात दि. 10 डिसेंबर 2021 पर्यंत नोंदणी करण्याकरीता प्रत्यक्ष  किंवा 07172-252295 या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त भैय्याजी येरमे यांनी केले आहे.