PM Kisan: शेतकऱ्यांच्या खात्यात 2 हजार जमा केल्यावर मोदी सरकारनं पाठवला खास संदेश

218
नवी दिल्ली, 3 जानेवारी: पंतप्रधान किसान सन्मान (PM Farmer Scheme) योजनेअंतर्गत प्रत्येक लाभार्थी शेतकऱ्याच्या (Beneficiary Farmers) खात्यात दोन-दोन हजार ( Rs. 2000 each ) रुपये जमा केल्यानंतर शेतकऱ्यांना सरकारच्या वतीनं एक संदेश ( Message ) पाठवण्यात आला आहे.

सुमारे 10 कोटी शेतकऱ्यांना (10 crore farmers) हे मेसेज आले असून त्यात शेतीबाबत एक महत्त्वाचा संदेश देण्यात आला आहे. शेतीसाठी पाठवण्यात आलेले पैसे शेतीसाठी वापरण्यासोबतच पिकांच्या पद्धतीतही सरकार आमुलाग्र बदल करू पाहत असल्याचा संदेश यातून मिळत आहे. काय आहे संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या नावे हा संदेश शेतकऱ्यांना पाठवण्यात आला आहे. यात लिहिलंय, “नव्या वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

पंतप्रधान किसान सन्मान योजनेअंतर्गत डिसेंबर 2021 ते मार्च 2022 या कालावधीसाठीचे 2 हजार रुपये आपल्या खात्यात आलेच असतील. या पैशांमुळे शेतीच्या कामातील काही गरजा पूर्ण होऊ शकतील. सेंद्रीय शेतीबाबतच्या ही फिल्म पाहण्यासाठी सोबतच्या लिंकवर जरूर क्लिक करा. आपला नरेंद्र मोदी..” शेती आणि निवडणुका पुढील काही दिवसांत पंजाब, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड यासारख्या कृषीप्रधान राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत.

या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं 1 जानेवारीच्या दिवशी 10.09 कोटी लाभधारक शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये 20,900 कोटी रुपये ट्रान्सफर केले आहेत. त्यानंतर दोनच दिवसांत पंतप्रधानांचा संदेश शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात आला आहे. योग्य विनियोग व्हावा शेतकऱ्यांच्या खात्यात जे पैसे सरकारच्या वतीनं ट्रान्सफर केले जातात, त्याचा योग्य विनियोग व्हावा आणि ते शेतीच्या कामांसाठीच वापरले जावेत, हा यामागचा सरकारचा उद्देश असल्याचं सांगितलं जात आहे. देशातील एकूण शेतकऱ्यांपैकी साधारण 86 टक्के शेतकरी हे अल्प भूधारक आहेत.

त्यांच्यासाठी वार्षिक 6 हजार रुपयांची मदत ही शेतीच्या अनेक कामांसाठी मदत करणारी ठरणार आहे. सेंद्रीय शेतीचा संदेश रासायनिक शेतीऐवजी अधिकाधिक शेतकऱ्यांनी सेंद्रीय शेतीकडं वळावं, यासाठीदेखील सरकारचा प्रयत्न सुरू असल्याचं यातून अधोरेखित होत आहे. या व्हिडिओत जीवामृत आणि घनजीवामृत ही दोन प्रकारची जैविक खतं कशी तयार करावीत, याची कृतीदेखील समजावून सांगण्यात आली आहे. यामुळे बियाण्यांवर आणि किटकनाशकांवर होणारा शेतकऱ्यांचा खर्च कमी व्हावा आणि अधिक लाभ शेतकऱ्यांना व्हावा, हा सरकारचा उद्देश असल्याचं सांगितलं जात आहे.

पैसे मिळाले का? सर्वाना पैसे मिळाले का, असा सवाल करताना जर शेतकऱ्याला त्याची FTO म्हणजे फंड ट्रान्सफर ऑर्डर दिसत असेल, तर त्यांनी निश्चिंत राहावं, असं या संदेशात म्हटलं आहे. ज्यांना पैसे मिळाले नाहीत, त्यांना पुढील एक-दोन दिवसांत ते मिळतील, असं सांगण्यात आलं आहे. ज्यांचं आधार व्हेरिफिकेशन झालं नाही, त्यांना मात्र पैशांसाठी जास्त काळ वाट पाहावी लागणार आहे. जेव्हा महात्मा गांधी यांना एका हिंदूचे संतप्त पत्र आले! अशी करा खातरजमा पीएम किसान योजनेच्या बेवसाईटवर https://pmkisan.gov.in/ जा. Beneficiary Status असं लिहिलेल्या ऑप्शनवर क्लिक करा त्यानंतर बँक खाते नंबर, आधार नंबर किंवा मोबाईल नंबर टाका Get Data या पर्यायावर क्लिक करा. तुमच्या खात्याशी संबंधित सर्व व्यवहारांची माहिती मिळेल