मुल – मॅजिक बस संस्थेचे वरिष्ठ जिल्हा कार्यक्रम अधिकारी मा. प्रशांत लोखंडे यांच्या मार्गदर्शनात व तालुका निरीक्षक निकिता ठेंगणे यांच्या नेतृत्वात मॅजिक बस इंडिया फाऊंडेशन चंद्रपुर संस्थेच्या वतीने मूल तालुक्यात कार्यक्रमा अंतर्गत १२ ते १६ वर्षे वयोगटातील ७००३ विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी खेळाद्वारे शिक्षण/जीवन कौशल्य विकास हा उपक्रम मागील वर्षा पासून अविरतपणे राबविला जात आहे.
मूल तालुक्यातील कोसंबी या गावात मा. मिताली सेठी मॅडम मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर, यांनी मुलं तालुक्या मधील कोसंबी गावात सुरू असलेल्या मॅजिक बस च्या खेळाद्वारे शिक्षण/जीवन कौशल्य विकास या उपक्रमाची पाहणी करीत असतांना विद्यार्थ्यांमध्ये रुजविली जाणारी जीवन कौशल्य (संवाद कौशल्य, गटकार्य, समस्यांची सोडवणूक, शिकण्यासाठी शिकणे, स्वव्यवस्थापन) इत्यादी बाबत माहिती घेत, शालेय बालपंचायत (मंत्रिमंडळ), वर्तवणूक व्यवस्थापण प्रणाली (BMS) ज्या द्वारे विद्यार्थ्यांच्या वागणुकीत सुधार घडविण्याचा प्रयत्न केला जातो, गट-करार म्हणजे काही नियमावली ज्यांचे विद्यार्थ्यांना पालन करायला शिकविले जाते, वार्षिक चक्र ज्या मध्ये संपूर्ण वर्ष भरातील शिकवण असते, अभ्यास कोपरा म्हणजे विद्यार्थ्यांनी आपल्या घरी अभ्यास करण्यासाठी तयार केलेली स्वतःची स्वतंत्र जागा.
अशा विविध बाबींची पाहणी केली. संपूर्ण निरीक्षणा अंती मॅजिक बस संस्थेच्या उपक्रमाची प्रसंशा करीत मॅजिक बस विषयी सकारात्मक अभिप्राय दिला. CEO मॅडम सोबत Bdo डॉ. मयूर कळसे, सरपंच रवींद्र कामडी, शामराव मोहू्ले, ग्राम पंचायत उपसरपंच, सर्व सदस्य व असंख्य गावकरी उपस्थित होते.
मॅजिक बस संस्थेचा उपक्रम तालुक्यात यशस्वी रित्या राबविण्या करीता मा. प्रशांत लोखंडे यांच्या मार्गदर्शनात मॅजिक बस संस्थेचे मा. निकिता ठेंगणे तालुका निरीक्षक मुल, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, सर्व शाळा सहाय्यक अधिकारी व समुदाय समन्वयक अथक परिश्रम घेत आहेत.