BREAKING : सर्व कॉलेज्स आजपासून बंद, राज्य सरकारने काढला आदेश

93

मुंबई, 07 जानेवारी : मुंबईमध्ये कोरोनाची तिसरी लाट येऊन धडकली आहे. त्यापाठोपाठ ओमायक्रॉनचा (Omicron cases Maharashtra) समूह संसर्ग सुरू झाला आहे. 

आता त्यापाठोपाठ राज्यातील सर्व महाविद्यालय बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ऑनलाइन पद्धतीने अभ्यासक्रम चालू करण्याबाबत शासनाने आदेश काढला आहे. (colleges closed in maharashtra) दोन दिवसांपूर्वीच उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत (Minister of Higher Education Uday Samant) यांनी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी कॉलेजेस कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद राहणार अशी घोषणा केली होती.

त्यानंतर आज राज्य सरकारकडून तसा आदेश काढण्यात आला आहे. सर्व अकृषि विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, स्वयंअर्थसहाय्य्त विद्यापीठे, तंत्रनिकेतन तसंच विद्यापीठांशी सलग्नित महाविद्यालतील ऑफलाईन पद्धतीने न घेता 15फेब्रुवारी, 2022 पर्यंत फक्त ऑनलाईन पद्धतीने सुरू ठेवण्यात आदेश काढण्यात आले आहे.  राज्यातील अकृषी आणि तंत्रनिकेतन कॉलेजेस हे येत्या 15 फ्रेब्रुवारीपर्यंत बंद करण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं सर्व कॉलेजेससाभ्य परीक्षा या ऑनलाईन पद्धतीनं घेण्यात येणार आहेत. सर्व विद्यापीठांनी तशी मान्यता दिली आहे.विद्यार्थ्यांसाठी सर्व विद्यापीठांना हेल्पलाईन सुरु करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. राज्यातील सर्व वसतिगृह बंद करण्यात आले आहेत.

परदेशातून आलेल्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह बंद करण्यात येणार नाहीत. परीक्षा ऑनलाइनच होणार राज्यातील कोरोना रुग्णांची आकडेवारी बघता गेल्या शैक्षणिक वर्षाप्रमाणे यंदाही सर्व विद्यापीठांच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं (Online Exams in Maharashtra) घेण्यात येणार आहे अशी घोषणा उदय सामंत यांनी केली आहे. राज्यातील सर्व विद्यापीठांनी यासाठी होकार दिल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून यंदाही कॉलेजेसच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं होणार आहेत.