बॉर्डर सिक्योरिटी फोर्समध्ये (BSF) भरती व्हायचंय? आत्ताच भरा अर्ज, अशी करा तयारी!

53

आपल्यापैकी अनेकजण देशसेवा करण्यासाठी भारतीय सैन्यामध्ये (India Army) भरती होण्याचे स्वप्न पाहत असतात.

अनेकजण प्रयत्न करतात परंतु त्यांच्या प्रयत्नांना फारसे यश येत नाही आणि म्हणूनच अशा वेळी निराशा मनात येते परंतु जर तुम्हीसुद्धा भारतीय सैन्यात सामील होण्याचे स्वप्न पाहत असाल आणि बॉर्डर सिक्योरिटी फोर्स (BSF) मध्ये जर नोकरी करून देशासाठी काहीतरी करायचे असेल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. अनेकदा आपण स्वप्न पाहतो परंतु ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी नेमके काय प्रयत्न करायला हवेत? आपली शारीरिक क्षमता (physical potential) कशी असायला हवी? कोठे जाऊन अर्ज (apply online form) करायचा आहे? कोणत्या वेबसाईटवर जाऊन आपल्याला फॉर्म भरायचा आहे, कोणकोणती कागदपत्रं लागणार आहेत? तसेच नेमकी पात्रता काय आहे या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण जाणून घेणार आहोत. कारण बॉर्डर सिक्यूरिटी फोर्समध्ये लवकरच भरती निघणार आहे.

बॉर्डर सिक्योरिटी फोर्स (BSF) मध्ये नोकरी करून देशसेवा करण्याचा सुवर्णयोग आलेला आहे. नुकतेच बीएसएफने कॉन्स्टेबल पदासाठी 2,788 पदांची भरती काढलेली आहे, यासाठी दहावी उत्तीर्ण झालेले महिला आणि पुरुष दोघेही 28 फेब्रुवारी पर्यंत बीएसएफच्या अधिकृत rectt.bsf.gov.in वेबसाईटवर जाऊन ऑनलाइन फॉर्म भरू शकतात. ज्या उमेदवारांनी परीक्षेचा फॉर्म भरलेला आहे त्यांना लेखी परीक्षा, फिजिकल परीक्षा आणि मेडिकल टेस्ट द्यावी लागेल आणि याच्या आधारावर त्यांची निवड केली जाईल.

पात्रता

या पदासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांना दहावी पास असणे गरजेचे आहे तसेच दोन वर्षाचा अनुभव किंवा वोकेशनल इंस्टीट्यूटच्या आयटीआय मधून 1 वर्षाचा सर्टिफिकेट कोर्स सोबतच ट्रेडमध्ये कमीत कमी एक वर्षाचा अनुभव किंवा ट्रेड मध्ये आयटीआय मध्ये 2 वर्षाचा डिप्लोमा केलेला असावा.

वय मर्यादा

उमेदवाराचे कमीत कमी वय 18 वर्षे आणि जास्तीत जास्त 23 वर्षे असणे गरजेचे आहे

शारीरिक पात्रता

उंची : पुरुष = 167.5 सेमी आणि महिला = 157 सेमी
छाती (फक्त पुरुषांसाठी) : 78-83 सेमी

एससी/एसटी/आदिवासी

उंची : पुरुष =162.5 सेमी आणि महिला = 155 सेमी
छाती (फक्त पुरुषांसाठी): 76-81 सेमी

​​​​वेतन/ मानधन

भरती प्रक्रियेमध्ये ज्या विद्यार्थ्यांची निवड केली जाईल त्या उमेदवारांना पे-मॅट्रिक्स लेवल -3, पे स्केल 21,700 रुपयांपासून 69,100 रुपये पर्यंत वेतन मिळेल.

या पदांसाठी होणार आहे भरती

  • पुरुष- 2651
  • सीटी मोची – 88
  • सीटी शिंपी – 47
  • सीटी कुक – 897
  • सीटी वाटर कॅरियर – 510
  • सीटी वॉशर मॅन – 338
  • सीटी बार्बर – 123
  • सीटी स्वीपर – 617
  • सीटी कारपेंटर – 13
  • सीटी पेंटर – 03
  • सीटी इलेक्ट्रीशियन – 04
  • सीटी ड्राफ्ट्समॅन – 01
  • सीटी वेटर – 06
  • सीटी माळी – 04
  • महिला – 137

अशा प्रकारे करा अर्ज

अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. हा अर्ज करण्यासाठी सर्वात आधी आपल्याला बीएसएफच्या अधिकृत म्हणजेच ऑफिशियल वेबसाईटवर rectt.bsf.gov.in भेट द्यायची आहे.

वेबसाइटच्या होमपेजवर Current Recruitment Openings वर क्लिक करा आणि आता BSF Constable Tradesman Recruitment 2022 Online Form लिंक वर जाऊन क्लिक करा. येथे क्‍लिक केल्यानंतर तुम्हाला Apply Here हा ऑप्शन दिसेल त्यानंतर विचारले गेलेली संपूर्ण सविस्तर माहिती भरून रजिस्ट्रेशनची प्रक्रिया पूर्ण करा. रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्ही एप्लीकेशन फॉर्म भरू शकतात. अशा पद्धतीने संपूर्ण व्यवस्थित फॉर्म भरून आवश्यक ती कागदपत्रे जोडून सबमिट बटनावर क्लिक केल्यावर तुमचा फॉर्म यशस्वीरीत्या स्वीकारला जाईल

जाहिरात क्र.: GROUPC/CT/2021

Total: 2788 जागा

पदाचे नाव: कॉन्स्टेबल (ट्रेड्समन) [CT]

अ. क्र.ट्रेड पद संख्या
पुरुषमहिला
1कॉब्लर8803
2टेलर4702
3कुक89747
4W/C51027
5W/M33818
6बार्बर12307
7स्वीपर61733
8कारपेंटर13
9पेंटर03
10इलेक्ट्रिशियन04
11ड्राफ्ट्समन01
12वेटर06
13माळी04
Total2651137
Grand Total2788

शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण + 02 वर्षे अनुभव किंवा 01 वर्षे अनुभवासह संबंधित ट्रेड मध्ये ITI किंवा ITI मधील संबंधित ट्रेड मध्ये 02 वर्षांचा डिप्लोमा.

शारीरिक पात्रता (Click Here)

वयाची अट: 01 ऑगस्ट 2021 रोजी 18 ते 23 वर्षे  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] 

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

Fee: General/OBC/EWS: ₹100/-   [SC/ST/ExSM/महिला: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 01 मार्च 2022  (11:59 PM)

अधिकृत वेबसाईट: पाहा