मूल तालुक्यातील मौजा कोसंबी येथील गावठाण जागेवर घरे बांधण्यात आलेल्या लाभार्थ्यांना घरीच आखीव पत्रिका मिळणार

81

मुल – मूल तालुक्यातील मौजा कोसंबी येथील उच्च शिक्षित सरपंच रविंद्र कामडी यांनी गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी नवीन संकल्पना राबवून अहोरात्र प्रयत्न करीत असल्याने कोसंबी गाव आदर्श ग्राम म्हणून विकासाच्या दृष्टीने वाटचाल करीत आहे. त्यामुळ जिल्हा स्तरावराल शासनाच आधकारा सुदधा कासबा गावाला प्रत्यक्ष भटा दऊन गावाचा व याजनाचा पाहणा करात आहत.कद्र शासनाच्या स्वामित्व योजने अंतर्गत ड्रोन कॅमेऱ्याने मोजणी करण्यात येऊन गावठाण जागेवर घरे बांधण्यात आलेल्या लाभार्थ्यांना घरीच आखीव पत्रिका मिळणार असल्याचा (The first experiment in Mul taluka) पहिला प्रयोग मुल तालुक्यातील कोसंबी येथे दिनांक ८ फेब्रुवारी २०२२ रोजी करण्यात आला.

ड्रोन मोजणी योजनेचा शुभारंभ मूलचे उपविभागीय अधिकारी महादेव खेळकर यांच्या शुभ हस्ते करण्यात आला या उपक्रमाच्या आयोजित कार्यक्रमा प्रसंगी उपस्थित प्रमोद धाडगे, जिल्हा अर्धीक्षक भूमि अभिलेख चंद्रपूर, ईल्लू मलाई, सर्वे ऑफ इंडिया, श्री.कारडवार साहेब संवर्ग विकास अधिकारी पंचायत समिती मुल, प्रमोद निकुरे उपअधीक्षक भूमी अभिलेख मुल,

कर्तव्य दक्ष रवींद्र कामडी सरपंच ग्रामपंचायत कोसंबी, सचिन पवार परीक्षण भूमापन मुल, उमेश बरलावार, भुमापक मुल, संजय पुषप्पलवार, विस्तार अधिकारी (पंचायत ) पंचायत समिती मुल, विजय कायरकर, स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2021 इंटरवियर, सारिका गेडाम, उपसरपंच ग्रामपंचायत कोसंबी, चंदाताई कामडी,

ग्रामपंचायत सदस्या,अरुणा वाढई ग्रामपंचायत सदस्या, ग्राम सेवक सूरज आकंपल्लीवार, यांचेसह सर्व ग्रामपंचायत सदस्य गण, आणि गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक शेतकरी बांधव इतरही नागरिक उपस्थित होते.

या योजनेच्या उपक्रमामुळे नागरिकांना आखीव पत्रिका मिळत असल्याने अधिकारी वर्गांचे व सरपंच यांचे लाभार्थ्यांनि आभार मानले आहे.