आधार कार्डावर मोबाइल नंबर अपडेट करणं झालं सोपं, फक्त एवढंच करा

75

तुम्हाला आधार कार्डाचा तपशील अपडेट करायचा असेल तर आता पद्धत एकदम सोपी करण्यात आली आहे. तुमचा मोबाइल नंबर आधार कार्डावर अपडेट केला नसेल तर ते करणं गरजेचं आहे. तुमचा मोबाइल नंबर अपडेट करायचा असेल तर तुम्हाला जवळच्या आधार कार्ड केंद्रात जावं लागेल. यासाठी कोणती कागदपत्रं लागतील हे जाणून घ्या.

1. Aadhaar कार्डावर मोबाइल नंबर अपडेट नसेल तर आधार कार्डावर आधारित असलेल्या ऑनलाइन सेवेचा फायदा मिळत नाही. कारण या सुविधांचा लाभ हवा असेल तर तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवरच OTP पाठवला जातो.

2. मोबाइल रजिस्टर्ड नसेल तर ऑनलाइन अॅड्रेस अपडेट किंवा नावात बदल करायचा असल्यास ते करणं अवघड जातं.

3. ज्या सेवेसाठी ITR व्हेरिफिकेशन आणि OPD अपॉइंटमेंटची गरज असते त्या सेवांचा लाभ मिळवण्यासाठी मोबाइल नंबर अपडेट करणं गरजेचं आहे.

तुमचा मोबाइल नंबर आधार कार्डाशी अपडेट केला नसेल तर लवकरच हे काम करा. पण हे काम ऑनलाइन करता येणार नाही. यासाठी आधार कार्ड केंद्रावरच जावं लागेल. तुमची बायोमेट्रिक पडताळणी केल्यानंतर तुमचा आधार कार्डचा डेटा मिळतो.

तिथे तुमचा मोबाइल नंबर रजिस्टर करायचा आहे. यासाठी 50 रुपये फी आहे.

4.आधार कार्डावर मोबाइल नंबरसोबतच फोटो, बायोमेट्रिक्स, लिंग, ई मेल ID अशी सगळी माहिती कोणत्याही कागदपत्राशिवाय अपडेट करता येते. नाव आणि जन्मतारीख अपडेट करताना मात्र कागदपत्रांची गरज आहे.

===================================================================