पंचायत समिती सभागृह मुल येथे कीटकनाशक फवारणी प्रशिक्षण कार्यशाळा

66

पंचायत समिती सभागृह मुल येथे कीटकनाशक फवारणी प्रशिक्षण कार्यशाळा तालुक्यातील अनेक शेतकरी उपस्थित होते. परिसरातील धान उत्पादक शेतकर्यांना कीटकनाशक फवारणी बाबत अधिक माहिती उपलब्ध व्हावी याकरिता तालुका कृषी अधिकारी पंस मूल यांचे माध्यमातून कार्यशाळा घेण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गट अधिकारी सुनील अतिथी तालुका विकास कारडवार, प्रमुख अधिकारी गायकवाड, डॉ. विनोद वैद्य, कृषी भास्कर तालुका कृषी अधिकारी किशोर चौधरी, मंडळ अधिकारी तिजारे उपस्थित होते. सदर कार्यक्रमात शेतक-्यांनी शेतातील पिकावर कीटकनाशक फवारणी करताना घ्यावयाची काळजी, डी. ए. पी. ऐवजी सिंगल सुपर फास्फेट या खताचा शेतात वापर व सद्यस्थितीत शेतीच्या हंगामासाठी खताची त्वरित उचल करणे याबाबत तालुका कृषी अधिकारी यांनी सर्व शेतक-यांना मार्गदर्शन केले. संचालन विस्तार अधिकारी रामचंद्र देशमुख, आभार प्रदर्शन नरेंद्र पेटकर, यांनी केले.