मुल शहर मोठे,मात्र प्रसाधनगृह कुठे ?

62

पुरूष शोधतात आडोसा,महिलांची कुचंबणा
मुल:- शहराची वाढती लोकसंख्या व ग्रामीण भागातून येणा-या नागरिकांचा वावर पाहता,शहरात मोठया प्रमाणात सार्वजनिक स्वच्छतागृहांची गरज आहे. मात्र सोमनाथ रोड ला जाताना एकमेव स्वच्छतागृह आहे. असे असले तरी या कडे कुणाचेही लक्ष नाही.
त्यामुळे मुल शहर मोठे,मात्र प्रसाधनगृह कुठे‘ असा प्रश्न निर्माण होत आहे.
स्थानिक नगरपालिका प्रशासनातर्फे सोमनाथ रोडच्या परिसरात एकमेव प्रसाधनगृहाची निर्मिती करण्यात आली आहे. असे असताना अन्य ठिकाणी स्वच्छतागृह उभारण्यात आले नाही. परिणामी मुल शहरात येणा-या पुरूषांना परिसरातील इमारतीच्या आवारभिंतीच्या आसरा घ्यावा लागतो. तर महिलांना पर्याय नसल्याने जिवाची तगमग सहन करावी लागते.
आज घडीला काही अपवाद वगळता प्रत्येकाकडे वैयक्तिक शौचालय आहे.असे असले तरी शहराचा वाढता व्याप पाहता,शहरात मात्र सार्वजनिक शौचालय अथवा प्रसाधनगृह पाहिजे त्या संख्येत नसल्याची खंत आहे.
परिणामी कामानिर्मित्य शहरात आलेल्या नागरिकांची विशेषता:महिलांची मोठी कुचंबणा होते.शासन,प्रशासनाकडून मोठया प्रमाणात भर देण्यात येत असताना सर्वत्र स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून ग्रामीण भागात संपूर्ण गाव गोदरीमुक्त व्हावे यासाठी प्रशासनाकडून विशेष मोहीम राबविण्यत येत आहे. या सर्व उपक्रमांसाठी लाखो रूपयांचा निधी पाण्यासारखा खर्चही करण्यात येत आहे.मात्र, हे करीत असताना नागरिकांच्या सोयीकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचेही वास्तव आहे.
शहराच्या विकासाची जबाबदारी नगरपरिषद प्रशासनाची असली तरी तेवढी प्रबळ इच्छाशक्ती नसल्याचे  नागरीकांमध्ये बोलल्या जात आहे.