राज्यसेवा पूर्व परीक्षेची तारीख जाहीर,१६१ जागांसाठी भरती

131

वृत्तसंस्था/मुंबई
महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागातील गट अ तसेच गट ब संवर्गातील एकूण १६१ पदांच्या भरतीकरिता राज्य सेवा पूर्व परीक्षा २0२२ ची जाहिरात (क्रमांक 0४५/२0२२) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. दरम्यान, ही जाहिरात आयोगाच्या वेबसाईटवर आज प्रसिद्ध झाली असल्याची माहिती आयोगाने ट्विट करुन दिली. या जाहिरातीमुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला असून परीक्षेसाठी तयारी करण्याचे आवाहन आयोगाने केले आहे. जाहिरातील गट ‘अ’५९, तर गट ‘ब’ साठी १४ पदांसाठी आणि इतर ८८ पदांसाठी ही भरती होणार आहे. पूर्व परीक्षेच्या निकाला आधारे मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांसाठी मुख्य परीक्षेची तारीख २१, २२, २३ जानेवारी २0२३, रोजी किंवा त्यानंतर आयोजित होण्याची शक्यता आहे.

जाहिरात क्र.: 045/2022

परीक्षेचे नाव: महाराष्ट्र राज्य सेवा पूर्व परीक्षा 2022

Total: 161 जागा

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र.पदाचे नाव पद संख्या
1सहायक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा, गट-अ09
2मुख्याधिकारी, नगरपालिका/परिषद, गट-अ 22
3बाल विकास प्रकल्प अधिकारी, गट-अ व तस्यम पदे 28
4सहायक आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, गट-ब02
5उप अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क,  गट-ब03
6कक्ष अधिकारी, गट-ब  05
7सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, गट-ब 04
8निरीक्षक प्रमाणित शाळा व संस्था तसेच तस्यम पदे88
Total161

शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1: 55% गुणांसह B.Com किंवा CA/ICWA किंवा MBA.
  2. पद क्र.2 ते 6 & 8: पदवीधर किंवा समतुल्य.
  3. पद क्र.7: भौतिकशास्त्र व गणित विषयासह विज्ञान अथवा अभियांत्रिकी शाखेतील पदवी.

वयाची अट: 01 सप्टेंबर 2022 रोजी 19 ते 38 वर्षे  [मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: महाराष्ट्र.

Fee: अमागास प्रवर्ग: ₹544/- [मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ: ₹344/- ]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 01 जून 2022 (11:59 PM)