विवाह नोंदणी प्रमाणपत्र कसे काढाल? कागदपत्रे आवश्यक,कशासाठी लागते

99

विवाह नोंदणी प्रमाणपत्र काढण्याची प्रक्रिया अधिक खर्चिक आणि वेळखाऊ असल्याने प्रमाणपत्र मिळविताना वधू-वरांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक सबमिट अर्ज भरण्यापासून करण्यापर्यंत आणि अधिकाऱ्यांची स्वाक्षरी मिळविण्यापर्यंत अनेक वेळा धावपळ होत आहे. त्यामुळे विवाह प्रमाणपत्र मिळविण्याकडे अनेकजण दुर्लक्ष करीत आहेत. लग्नाचा कायदेशीर पुरावा म्हणून विवाह प्रमाणपत्र गरजेचे असते. दुय्यम उपनिबंधक कार्यालयात लग्न पार पडल्यानंतर या विवाहाची कायदेशीर नोंदणी करून प्रमाणपत्र मिळविता येते. विवाह प्रमाणपत्र नगर परिषद नगर,पंचायत, ग्रामपंचायत, महापालिका तसेच दुय्यम निबंधकांकडे अर्ज करून संपूर्ण कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर विवाह प्रमाणपत्र मिळते.

नागरिक प्रमाणपत्र ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी विवाह मिळविण्यासाठी अधिक प्रमाणात नोंदणी करतात शासकीय काम तसेच कायदेशीर बाबींसाठीच अधिकजण नोंदणी पद्धतीने विवाह करतात. नोंदणी प्रमाणपत्रामुळे भविष्यात काही अडचणी उदभवल्यास कायदेशीर पुरावा म्हणून उपयोग होतो. अनेकजण लग्नाला बराच कालावधी उलटतो तरीही नोंदणी करीत नसल्याचे वास्तव आहे

विवाह नोंदणी प्रमाणपत्र कसे काढाल? ग्रामपंचायत क्षेत्रात लग्न झाल्यास ग्रामपंचायतीमधून विवाह प्रमाणपत्र काढता येते. शहर क्षेत्रातील नागरिकांना दुय्यम निबंधक कार्यालयात अर्ज करावा लागतो. मात्र, यासाठी पुरावा म्हणून | कागजपत्र, साक्षीदार असणे गरजेचे असते.

कोणकोणती कागदपत्रे आवश्यक ■ शाळा सोडल्याचा दाखला, पासपोर्ट, जन्माचा दाखला, अधिवास दाखला. ■ रहिवासी पुरवा, रेशन कार्ड, इलेक्शन कार्ड, पासपोर्ट, लाईट बिल ■ तीन साक्षीदारांचे रहिवास पुरावे, लग्नपत्रिका नसल्यास १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर जॉईट डिक्लेरेशन ■ पासपोर्ट साईज फोटो, विवाह करणाऱ्या पुरोहिताची स्वाक्षरी,

कशासाठी लागते प्रमाणपत्र   :-  माहेरचे नाव बदलविणे, बँक खाते उघडणे, पासपोर्ट किंवा व्हिसा प्राप्त करण्यासाठी उत्पन्नाचा दाखला मिळविणे, विमा रकमेचा दावा करण्यासाठी, मालमत्ता दावा मिळविण्यासाठी विवाह नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक आहे.