विद्यापीठाची ऑफलाइन परीक्षा १० जूनपासून

48

गडचिरोली : स्थानिक गोंडवाना विद्यापीठाच्या वतीने विद्यापीठाच्या उन्हाळी – २०२२ च्या लेखी परीक्षा ऑफलाइन बहुपर्यायी पद्धतीने घेतल्या जाणार आहेत. विद्यापीठाच्या वतीने १ जून २०२२ पासून घेतल्या जाणाऱ्या सर्व परीक्षा स्थगित करण्यात आल्या आहेत. नव्याने १० जूनपासून परीक्षा होणार आहेत. याबाबत गोंडवाना विद्यापीठाच्या वतीने २४ मे रोजी परिपत्रक काढण्यात आले आहे. कोरोना काळात गोंडवाना विद्यापीठाच्या वतीने ऑनलाइन ऑब्जेक्टिव्ह स्वरुपात परीक्षा घेण्यात आल्या होत्या. आता कोरानाचा प्रादुर्भाव संपल्यानंतर विद्यापीठाच्या वतीने ऑफलाइन वर्णनात्मक परीक्षा घेण्यात येईल, असा अदाज बांधण्यात आला होता.

विद्यापीठांच्या परीक्षांच प्रारुप ठरविण्यासाठी २३ मे रोजी सोमवारला विद्यापीठाच्या विद्या परिषदेची सभा गोंडवाना विद्यापीठात आयोजित करण्यात आली होती. त्यामुळे विद्यापीठाच्या परीक्षा पद्धतीमध्ये बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला. विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयाचे सर्व प्राचार्य, शिक्षक, पदव्युतर विभागाचे विभागप्रमुख तथा संबंधित विद्यार्थ्यांनी, विद्यापीठाच्या उन्हाळी २०२२ च्या १ जून २०२२ पासून सुरू होणाऱ्या सर्व परीक्षा या परिपत्रकाद्वारे स्थगित करण्यात आलेल्या आहेत.

आता १० जूनपासून बहुपर्यायी लेखी परीक्षा होणार असल्याचे विद्यापीठाने कळविले आहे. सदर उन्हाळी परीक्षेला नवीन विद्यार्थी प्रविष्ठ होणार आहेत. याबाबतचे नियोजन पूर्ण झाले आहे.