टेकाडी येथे बाल संगोपनावर कलापथक कार्यक्रम

44

मूल/प्रतिनिधि

ग्रामीण भागातील महिलांना लहान बाळाची काळजी घेण्याबाबत जनजागृती होण्याच्या दृष्टीने तालुका वैदयकीय अधिकारी कार्यालय मूल च्या वतीने व जनकल्याण शिक्षण संस्था मूल अंतर्गत असलेल्या जनकल्याण कला संच मूलच्या कलापथक कार्यक्रमांचे आयोजन टेकाडी येथे करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ. सुमेध खोब्रागडे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी टेकाडीचे सरपंच सतिश चौधरी होते तर प्रमूख पाहुणे म्हणून समुदायी आरोग्य अधिकारी हर्षाली दूधपचारे, जनकल्याण संस्था मूल चे अध्यक्ष राजू गेडाम, आरोग्य सहाय्यक पुरुषोत्तम गायकवाड, आरोग्य सेवक विकास आकनुरवार, आरोग्य सेविका मेघा कुंभारे आदि उपस्थित होते. यावेळी लहान बाळाची योग्य काळजी घेतली जात नसल्याने अनेक बालकांचा मृत्यू होतो तसेच मातेनी योग्य प्रमाणात आहार घेणे गरजेचे असते माञ ग्रामीण भागात याबाबात माहिती नसल्याने कुपोषित बाळ जन्माला येतो. यासाठी योग्य काळजी घेणे आवश्यक असते हेही कलापथकातून प्रबोधन करण्यात आले. तसेच ग्रामीण भागात अंधश्रद्धा असल्याने बाळाचा उपचार वैद्यकिय कार्यालयात न करता भूतबाधा काढण्याचा प्रयत्न करतात असा प्रकार घडु नये व बाळाचा उपचार प्राथमिक स्वास्थ केंद्रांत करण्याविषयी कलेच्या माध्यमातून उद्बोधन करण्यात आले.कलापथकातील कलावंतांनी बालकाची काळजी घेण्याविषयी उपस्थितांची मने जिंकून घेतली. जनकल्याण कला संच मूल चे कलावंत अमोल वाळके, बंडु अल्लीवार, रवि वाळके, सौरभ गेडाम, हेमंत मेश्राम आशिष गुरूनुले, शशिकांत गणविर, प्रज्ञा निमगडे, पौर्णिमा गेडाम आदींनी आपली कलाकृती सादर करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.