या योजनांसाठी करता येणार शेतक-यांना अर्ज,उत्पन्नवाढीसाठी होणार अंमलबजावणी

82

शेतक-यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी,त्यांचे जीवनमान उंचवावे,आर्थीक संपन्नता यावी,
यासाठी षासनस्तरावर विविध योजना अमलात आणल्या जात आहेत.यासाठी शेतक-यांनी आपले प्रस्ताव दाखल करावेत. सातबारा उतारा,आधार कार्ड,बॅंक पासबुक, हमीपत्र,खरेदी करण्यासाठी साधन आदीची पुर्तता करावी लागणार आहे.षासनाच्या अल्पभूधारक शेतकरी योजना,महाडीबीटी षेतकरी योजना,शेतकरी अनुदान योजना,षेळी-मेंढी पालन अनुदान योजना,यांत्रिकीकरण योजना आदी योजनासाठी शेतकरी अर्ज करू षकतात

कसा कराल अर्ज ?
कृशि विभागाच्या विविध योजनासाठी अर्ज करायचा असल्यास महाडीबीटी पोर्टलवर जावे लागणार आहे.

आॅनलाईन अर्ज केल्यानंतर षेतक-यांना योजनेत निवड झाल्याचा संदेष येतो,त्यांनतर कृशी सहायकांच्या मार्गदर्षनात पुढी प्रक्रिया सुरू होते.

  • प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना – प्रती थेंब अधिक पिक (सूक्ष्म सिंचन घटक)
  • कृषी यांत्रिकीकरण उप-अभियान
  • राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान : अन्नधान्य, तेलबिया, ऊस व कापूस
  • बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना (आदिवासी उप योजना / आदिवासी उप योजना बाह्य)
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना
  • एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान
  • कोरडवाहू क्षेत्र विकास कार्यक्रम
  • भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना
  • राष्ट्रीय कृषी विकास योजना – रफ्तार
  • राज्य कृषी यांत्रिकीकरण योजना
  • मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना
  • कृपया आपला वर्तमान मोबाइल नंबर आपल्या आधार क्रमांकाशी जोडलेला आहे याची खात्री करा
  • लॉगिन पासवर्ड आणि सुरक्षा मजकूर पुष्टी झाल्यानंतर लॉगिनसाठी लॉग इन करा बटणावर क्लिक करा
  • जर रजिस्ट्रेशन करताना आपण आपला पासवर्ड विसरला असल्यास, “पासवर्ड विसरला” बटणावर क्लिक करा
  • जर रजिस्ट्रेशन करताना आपण आपला वापरकर्ता नाव विसरला असल्यास, “वापरकर्ता नाव विसरला” बटणावर क्लिक करा
      • कृषि यांत्रिकीकरणास प्रोत्साहन देणे व शेती मधील उर्जेच्या वापराचे प्रमाण २ किलोवॅट/ हेक्टर पर्यंत वाढविणे.

    उद्देश :

      • जेथे शेतीमधील उर्जेचा वापर कमी आहे अशा क्षेत्रामध्ये व अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांपर्यंत कृषि यांत्रिकीकरणाचा लाभ पोहोचविणे.
      • प्रात्याक्षिके व मनुष्यबळ विकासाद्वारे सहभागीदारमध्ये जागरुकता निर्माण करणे.

    धोरण :

      कृषि यंत्र/ अवजारे यांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य देणे प्रशिक्षण व प्रात्यक्षिका द्वारे सहभागीदारांना कृषि यांत्रिकीकरणास प्रोत्साहित करणे

    अनुदान

      • या योजनेतून खालील दिलेल्या कृषि यंत्र / अवजारे यांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य देण्यात येईल:
      • १) ट्रॅक्टर
      • २) पॉवर टिलर
      • ३) ट्रॅक्टर/ पॉवर टिलर चलित अवजारे
      • ४) बैल चलित यंत्र/अवजारे
      • ५) मनुष्य चलित यंत्र/अवजारे
      • ६) प्रक्रिया संच
      • ७) काढणी पश्च्यात तंत्रज्ञान
      • ८) फलोत्पादन यंत्र/अवजारे
      • ९) वैशिष्ट्यपूर्ण यंत्र अवजारे
      • १०) स्वयं चलित यंत्रे
      • भाडे तत्वावरील सुविधा केंद्र:
      • १) कृषि अवजारे बँकेची स्थापना
      • २) उच्च तंत्रज्ञान , उत्पादन सेवा सुविधा केंद्राची स्थापना
      • *लाभाच्या माहितीसाठी कृपया सोबतचे प्रपत्र पाहावे.

    View Benefits


    पात्रता

    •  शेतकऱ्याचे आधार कार्ड असणे अनिवार्य आहे
    •  शेतकऱ्याकडे ७/१२ उतारा व ८ अ असावा
    •  शेतकरी अनु. जाती , अनु.जमाती मधील असल्यास जातीचा दाखला आवश्यक
    •  फक्त एकाच औजारासाठी अनुदान देय राहील म्हणजेच ट्रॅक्टर किंवा यंत्र/ अवजार
    •  कुटुंबातील व्यक्तीच्या नावे ट्रॅक्टर असल्यास , ट्रॅक्टरचलित औजारासाठी लाभ मिळण्यास पात्र असेल परंतु ट्रॅक्टर असल्याचा पुरावा सोबत जोडणे आवश्यक
    •  एखाद्या घटकासाठी / औजारासाठी लाभ घेतला असल्यास त्याच घटक/ औजारासाठी पुढील १० वर्षे अर्ज करता येणार नाही परंतु इतर औजारासाठी अर्ज करता येईल
    • उदा. एखाद्या शेतकऱ्याला सन २०१८-१९ मध्ये ट्रॅक्टरसाठी लाभ देण्यात आला असेल तर पुढील १० वर्षे ट्रॅक्टरसाठी लाभ मिळण्यास पात्र ठरणार नाही सन २०१९-२० मध्ये इतर औजारासाठी लाभापात्र राहील


    आवश्यक कागदपत्रे

    •  आधार कार्ड
    •  ७/१२ उतारा
    •  ८ अ दाखला
    •  खरेदी करावयाच्या अवजाराचे कोटेशन व केंद्र शासनाच्या मान्यताप्राप्त तपासणी संस्थेने दिलेला तपासणी अहवाल
    •  जातीचा दाखला ( अनु. जाती व अनु. जमाती साठी )
    •  स्वयं घोषणापत्र
    •  पूर्वसंमती पत्र