मुल येथील जुन्यावस्ती मधील डबके जलमय तसेच पाणी जाण्यासाठी नाली व रस्ता नाही

43

काल परवा आलेल्या पहिल्याच पावसात जुन्या वस्तीमधील खुल्या जागेवरील डबके जलमय झाल्याने नागरीकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. पावसाळायापूर्वी नागरिकांना पावसातून कोणत्याही प्रकरच्या समस्या होऊ नये म्हणून उपाय योजना करणे नगरपरिशदेची जबाबदारी असते.पावसाळयात जुन्या वस्तीमधील नागरीकंाना दरवर्शी समस्यांना समोर जावे लागते.

तसेच दुसरी समस्या षहरातील मुख्य मार्गावर आणि विश्रामगृह बांधकाम विभागासमोरील असलेल्या भूखंड क्रमांक 949 आणि 948,938,946,953 दरम्यान रस्तावर अवैद्य विटमातीचे कुंपण नगरपालिकेच्या परवानगीषिवाय बांधण्यात आली आहे.नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे सदर अतिक्रमण तत्काळ हटविण्या यावे.
नगरपालिकेकडे अनेक वर्शापासून अवैद्यरीत्या केलेल्या अतिक्रमणाची तक्रार केली होती. त्यानंतर पालिकेने नोटीस देऊन थातूर मातूर कारवाई केल्याचा आरोप जुन्यावस्तीमधील नागरीकांनी केली आहे.
परिणामी पहिल्याच पावसात जुन्या वस्तीमधील मोठया प्रमाणात पाणी जमा झाले.त्यामुळे नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागल. अषी प्रतिक्रीया जुन्या वस्तीतील नागरीकांनी केली आहे.