स्वातंत्र्याचाअमृतमहोत्सव अंतर्गत मूल कार्यालयाच्या इमारतीवर रोषणाई लखलखाट, स्वातंत्र्य दिनाची झळाळी

64
एका दिवसावर येऊन ठेपलेला भारतीय स्वातंत्र्यादिन यंदा विशेष आहे, देशाच्या स्वातंत्र्याचे हे अमृत महोत्सवी वर्ष आहे, त्याअनुषंगाने मूल नगरपालिकेसह  शहरातील विविध शासकीय,निमशासकीय, खासगी संस्थांची कार्यालये रोशणा्ईने झळाळून निघाली आहे. एवढेच नव्हे तर शहरातील काही मार्गांवरही रोशणाई करण्यात आली आहे.स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवार्निमित्त  आकर्षक रोषणार्ड़ करण्यातआली आहे. रात्रीच्या वेळी लक्ष वेधून घेणारे रंगीबेरंगी दिव्यांच्या डरगमगाटात उजळणारे ये-जा करणायांसह प्रत्येक जण आपल्या   मोबाईलमध्ये केंद करत होते,स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे निमित्ताने देशभर विविध कार्यक्रम सुरू आहे. नागरिकासह शासन पातळीवरही हा अभियान उत्साहपूर्वक वातावरणात पार पाडल्या जात आहे. स्वातंत्र्याचा महोत्सव सणासारखा साजरा करीत याला उत्सवाचे स्वरूप मूल येथील कल्पक अधिकाऱ्यांनी दिले आहे. विविध कार्यक्रमाचे आयोजन करीत असतानाच या प्रशासकीय इमारतीलाही तिरंगी विद्युत रोषणाई करीत नागरिकांचे पारणे फेडत आहे.
उपविभागीय अधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय, मूल पंचायत समिती मुल, नगरपरिषद सार्वजनिक बांधकाम विभाग या इमारतीवर तिरंगी विद्युत रोषणाई केल्याने देखणे स्वरूप प्राप्त झाले आहे.स्वातंत्र्यचा 75 वा वर्धापन दिन ध्वजारोहण समारंभ मूलकार्यालय येथे संपन्न होणार आहे. #स्वातंत्र्याचाअमृतमहोत्सव च्या औचित्याने तेथील इमारतीवर झालेली आकर्षक रोषणाई,सर्वांचे लक्ष वेधून घेतेय.