मालधक्काच्या विरोधात मूलच्या युवकांचा मूक मोर्चा,निवेदन देताना

54
मूल (प्रतिनिधी)
मुल येथील कर्मवीर कॉलेज ग्राउंड वरील मोठया प्रमाणात सागाची (८०-९०) व ईतर किसमची झाडे रेल्वे मालधक्क्याचे कामाकरिता करण्यात येणारी वृक्षतोड अतीतातळीने थांबवण्यात यावी.20/09/2022 ला सकाळी 11 वाजता गांधी चौक मुल येथून संपूर्ण युवा वर्ग राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मुक मोर्चा काढण्यात आला.मुल शहरात रेल्वे विभागाद्वारे रेल्वे मालधक्क्याचे काम करण्यात येत आहे. सदर जागा ही कर्मविर महाविद्यालय परिसरालगत असुन या विद्यालयात मोठया प्रमाणात विद्यार्थी शिक्षण घेत आहे. सदर परिसर हा हिरवळीने व्याप्त असुन विद्यार्थ्यांच्या तसेच नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने उपयुक्त आहे. या महाविद्यालयाच्या क्रिडांगण परिसरात मोठया प्रमाणात सागाची (७०-८०) व ईतर किसमची झाडे आहे. सदर झाडे तोडल्यास पर्यावरणाची समस्या निर्माण होवू शकते.निसर्गवर्णनाशिवाय कुठलेही साहित्य पूर्ण होऊ शकत नाही
वृक्षांना त्यांचे प्राण गमवावे लागत आहेत.निसर्गाचा आणि पर्यावरणाचा कोणीही विचार करताना दिसून येत नाही
झाडांचा आणि निसर्गाचा संबंध खूप जवळचा आहे. पृथ्वीवर जगण्यासाठी लागणारी हवा आणि पाणी हे झाडांवर अवलंबून आहे


जेवढी वृक्षसंख्या जास्त तेवढा पाऊस जास्त पडतो. आता जर आपणच झाडे तोडली तर पाऊसाचे प्रमाण कमीच होईल.झाडे देखील श्वसन क्रिया करत असतात ज्यामध्ये ऑक्सिजन बाहेर सोडून कार्बन डायऑक्साइड आत घेतात तसेच गाड्यांमधून आणि कारखान्यांमधून बाहेर पडणारे विषारी वायू हे देखील झाडेच शोषून घेतात तसेच वायू प्रदूषणही झाल्याने आरोग्याच्या समस्या वाढत आहेत. वृक्षतोड थांबवून परिसरात जर झाडांची संख्या वाढवली तर माणसाचे आरोग्य सुधारेल आणि दुष्काळ कधी येणार नाही. मूल शहराच्या वतीने आपणास निवेदन सादर करण्यात येते  कर्मवीर कॉलेज ग्राउंड वरील झाडे तोडल्यास मूल शहरातील जनतेतर्फे  रस्ता रोको आंदोलन करणात येणार.जर ही मागणी पूर्ण झाली नाही तर आम्ही  मुलं येथे आंदोलन करू आंदोलना दरम्यान जर कोणता अनुचित प्रकार पडल्यास त्या प्रशासन जबाबदार राहणार. *याकरिता मुल शहरातील संपूर्ण युवा वर्ग यांच्या तर्फे गांधी चौक येथून मूक मोर्चा काढून मान. तालुका दंडाधिकारी साहेब कार्यालय मुल यांना निवेदन देण्यात आले. निवेदन देताना संपूर्ण युवा वर्ग उपस्थित होते.