आता ट्रॅक्टर, ट्रॉली खरेदी करण्यासाठी अनुदान ,नव्याने सुरू केली योजना !अर्ज प्रक्रिया सुरू .

136
  1. योजनेविषयीची माहिती

कृषी यांत्रिकीकरण, ही केंद्र शासनाची व राज्य शासनाची एकत्रितपणे राबवलेली योजना आहे. या योजनेमध्ये केंद्र शासन 60 टक्के व राज्य शासन 40% निधी लाभार्थ्यांसाठी प्रदान करत असते. शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या अवजारांच्या खरेदी करिता. या योजनेमार्फत अर्ज करता येतो. उदाहरणार्थ ट्रॅक्टर, ट्रॅक्टरचलित अवजारे, पॉवर टिलर, स्वयंचलित अवजारे इत्यादी…

  1. ट्रॅक्टर साठी व इतर ट्रॅक्टरचलित अवजारांसाठी रज कशा प्रकारे करावा

 शेतकऱ्यांना कृषी अवजारासाठी अर्ज करण्यास ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून तुम्ही शासकीय योजनेचा लाभ घेऊ शकता. शेतीविषयक सर्व प्रकारच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टल वरती जाऊन तुम्ही अर्ज केला व त्या योजनेच्या पात्रतेत तुम्ही बसला की तुम्हाला शासकीय अनुदान दिले जाईल. किंवा अनुदाना मार्फत तुम्हाला यंत्रे अवजारे मिळतील. अर्ज करण्यासाठी सर्वात खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करावे त्याचे आधी या योजनेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.

  1. अनुदान किती मिळते Tractor Trolley Anudan

ट्रॅक्टर साठी यासोबत इतर कृषी अवजारांसाठी 40% व 50 टक्के शासकीय अनुदान मिळते, ज्यामध्ये अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील शेतकरी आणि महिला शेतकरी त्यासोबतच अल्पभूधारक, अत्यल्प भूधारक प्रवर्गाच्या शेतकऱ्यांना 40% आणि इतर प्रवर्गातील शेतकऱ्यांना 50 टक्के शासकीय अनुदान मिळते.

  1. योजनेचा लाभ घेण्यासाठी कागदपत्रे कोणकोणती लागतात

या योजनेसाठी अर्ज करावा लागतो तो अर्ज करत असताना सर्वसाधारण प्रवर्गाच्या शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा सातबारा उतारा, 8 अ खाते क्रमांक, आधार कार्ड, बँक पासबुक इत्यादी कागदपत्र लागतात. यासोबतच इतर प्रवर्गातील शेतकऱ्यांकरिता जातीचे प्रमाणपत्र लागते.

  1. अशाप्रकारे केली जाते लाभार्थी यांची निवड

महाडीबीटी पोर्टल वरती शेतकऱ्यांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने केल्यावर, त्या ठिकाणी राज्य शासनाकडून ऑनलाइन पद्धतीने लॉटरी काढली जाते. लॉटरी काढल्यानंतर जे लाभार्थी शेतकरी असतील, त्यांची निवड योजनेसाठी होते व त्यांना याचा मेसेज त्यांच्या मोबाईल वरती पाठवला जातो.

  1. लाभार्थी निवडीसाठीचे प्राधान्य आशा प्रकारे

ऑनलाइन पद्धतीने लॉटरी काढत असताना अपंग किंवा दिव्यांग शेतकऱ्यांसाठी तीन अर्ज आरक्षित असतात, यासोबतच महिला शेतकरी यांना पण तीन अर्ज आरक्षित असतात, परंतु त्यांचे अर्ज पुरेशा प्रमाणात नसतील तर इतर लाभार्थ्यांचा सुद्धा त्या ठिकाणी विचार केला जातो. यासोबतच अनुसूचित जाती, जमातील प्रवर्गातील शेतकऱ्यांना त्यांच्या आरक्षणाप्रमाणे लॉटरीच्या माध्यमातून निवड केली जाते.

  1. लाभार्थी निवड झाल्यावर अवजारे खरेदी साठी शासनामार्फत मिळणारी पूर्वसंमती

लॉटरीमध्ये निवड झाली की शेतकऱ्यांना पूर्वसंमतीचे पत्र भेटते, ते पत्र त्यांना ऑनलाईन प्रिंट सुद्धा करता येते. पूर्व संमती मिळाल्यानंतर विहित मुदतीत शेतकऱ्यांनी योजनेच्या माध्यमातून अवजारे खरेदी करणे आवश्यक आहे. अवजारे खरेदी केल्यानंतर त्यांची संपूर्ण तपासणी केली जाते व शासकीय अनुदान तुम्हाला प्राप्त होते.

शेतकरी मित्रांनो विविध शासकीय योजनांसाठी महाडीबीटी पोर्टल वरती ऑनलाईन पद्धतीने अर्ज सेवा उपलब्ध झाली आहे. महाडीबीटी शासकीय वेबसाईट असून त्यावर तुम्ही कृषी यांत्रिकीकरणासाठी यासोबतच दाल मिल इत्यादी गोष्टींसाठी अर्ज करू शकता.

योजनेचा लाभ घेण्यासाठी अशाप्रकारे ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा

  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी सर्वात आधी महाडीबीटी या पोर्टल वरती जाऊन आपली स्वतःची नोंदणी करून घ्यायची आहे. खालील दिलेले लिंक वरती केले की तुम्ही महाडीबीटी या पोर्टल वरती जाता.
  • पोर्टल वरती गेल्यानंतर व नाव नोंदणी केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला तुमचे आधार कार्ड, बँक पासबुक, यासोबतच सातबारा नंबर, आठ अ खाते नंबर इत्यादी कागदपत्रांची माहिती अपलोड करायची आहे.