ग्रामपंचायत बोरचांदली येथे आधार कार्ड नोंदणी शिबीर; चिमुकल्याचेही आधार कार्ड नोंद

45

आधार कार्ड हा भारतातील प्रत्येक नागरिकांसाठी केंद्र सरकारने सुरू केलेला उपक्रम आहे(Aadhar Card is an initiative launched by the Central Government for every citizen of India). नवीन जन्मलेल्या बाळापासून ते ज्येष्ठ नागरिकापर्यंत आज 17 नोंदणी करण्यात आली.हर्ल्थ आयडी कार्ड, प्रधानमंत्री सन्मान निधी योजना, मातृवंदना योजना,आधार लिंक,नविन विवाह झाल्यानंतर नावात बदल करण्यासाठी जन्मतारीखे मध्ये बदल करण्यासाठी, प्रत्येकाला आधार कार्ड अनिवार्य आहे. राज्य सरकार, ते अनेक विविध संस्था आधार कार्ड नोंदणीसारखे शिबीर राबवित असतात. तहसिल कार्याल मुल अंतर्गत महाआयटी चंन्द्रपूर यांच्यावतीने ग्रामपंचायत बोरचांदली येथे आधार कार्ड शिबिराचे आयोजन सुरू आहे.
         आज नुकतेच एक महिना पूर्ण झालेल्या बालकाचे आधार कार्ड काढण्यात आले. यावेळी सरपंच अनीता नरेंन्द्र सेमस्कार,उपसरपंच हरीभाऊ येनगंटीवार,पोलीस पाटील दशरथ मडावी,आशा वक्सर््ा छायाताई गजानन गोंगाले,आधार संचालक पराग खोब्रागडे,अक्षय मडावी,राजेश कोसरे, गावातील प्रतिष्ठीत नागरीक,महिला व आशा वर्कस, ग्रामपंचायत पदाधिकारी, कर्मचारी ,अंगणवाडी सेवीका,शाळेतील विद्यार्थी,विद्यार्थीनी आदी उपस्थित होते. आज दि.10 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर पर्यंत हे आधार कार्ड शिबीर सुरू असणार आहे. सकाळी 10 ते सांय 5 वाजेपर्यंत हे शिबीर खुले राहणार असल्याचे अक्षय मडावी यांनी सांगितले