घरपोच मिळवा हयातीचा दाखला.आवश्यक कागदपत्रे काय ?पीपीओ आधार लिंक हवा

100

विविध शासकीय सुविधा किंवा सेवानिवृत्तांना पेन्शन मिळविण्यासाठी दरवर्षी हयात प्रमाणपत्र जोडावे लागते.हे प्रमाणपत्रकोरोना काळात अनेक सेवानिवृत्तांना त्रास झाला होता. त्यामुळे हयातीचा दाखला किंवा डिजि
टल जीवन प्रमाणपत्र घेण्यासाठी सिएसी केंन्द्रचालकांना बोलावून घरपोच दाखला देण्याची
व्यवस्था करण्यात आली. शासकीय सेवेतील व अन्य सेवेतील सेवानिवृत्त विभागाच्या या सेवेचा
लाभ घेत आहेत.

कशासाठी लागते हयातीचे प्रमाणपत्र :— सर्व ​सेवानिवृत्तांना वर्षातून एकदा नोव्हेंबर महिन्यात
आपल्या हयातीचा दाखला सादर करावा लागतो. त्यासाठी ज्या बॅंक शाखेतून पेन्शनची वितरण
होते.तिथे जाणे बंधनकारक असते. तिथे जाऊन संबंधित कागदावर निवृत्तांना स्वाक्षरी करावी
लागते.

आवश्यक कागदपत्रे काय ?
सर्वीस किंवा फॅमिली पेन्शनची कागदपत्रे,पेन्शन अदा करणार विभाग,पेन्शन मिळणा—या बॅंक
अथवा पेन्शन पेमेंन्ट आर्डर पीपीओ क्रमांक,पेन्शनधारकांचा खातेक्रमांक,पेंन्शनचा लाभ
घेण्या—याचा मोबाईल आणि आधार क्रमांक ही माहिती दयावी लागते.

पीपीओ आधार लिंक हवा
प्रेरणा आॅनलाईन सिएसी केंन्द्र मुल मध्ये आतापर्यंत या सुविधेचा 100 ते 150 सेवानिवृत्तांनी
आतापर्यंत लाभ उचलला आहे. यामुळे घरपोच सेवा मिळत आहे. संबंधितांचा पीपीओ आणि
आधारचा क्रमंाक लिंक असणे अनिवार्य असल्याचे कॉमन सर्वीस(सिएसी) सेंन्टरचे संचालक प्रमोद मशाखेत्री सांगितले.