पोलीस भरती साठी उरले सात दिवस, 90 मिनिटांत ठरणार तरुणांचं भविष्य;18,000 पदांसाठी असं असेल परीक्षेचं पॅटर्न

144

राज्यात नुकतीच महाराष्ट्र पोलीस भरतीची घोषणा करण्यात आली आहे. शिंदे आणि फडणवीस सरकारनं तब्बल 18,000 पेक्षा अधिक पोलीस कॉन्स्टेबल भरतीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता रानातील तरुणांना पोलीस होण्याचा गोल्डन चान्स मिळणार आहे. त्यासाठीची अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. तसंच 9 नोव्हेंबर 2022 पासून यासाठीची नोंदणी प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. मात्र ही भरती प्रक्रिया होणार तरी कशी? यासाठी परीक्षा कशी होणार त्याचं पॅटर्न कसं असणार याबद्दलचे प्रश्न तरुणांना पडले आहेत. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला या पदभरतीचं संपूर्ण परीक्षेचं पॅटर्न सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया.

महाराष्ट्र पोलीस भरती 2022प्रक्रियेत दोन चाचण्या घेण्यात येणार आहेत. यामध्ये शारीरिक चाचणी आणि लेखी चाचणी होणार आहे. सुरुवातीला उमेदवारांची शारीरिक परीक्षा होणार आहे. त्यानंतर लेखी परीक्षेचं आयोजन करण्यात येणार आहे. या दोन्ही परीक्षांच्या पॅटर्नबद्दल जाणून घेऊया.

अशी असेल शारीरिक चाचणी

पोलीस शिपाई पदासाठी शारीरिक चाचणी एकूण 50 गुणांची होणार आहे. यामध्ये पुरुष उमेदवारासाठी 1600 मीटर धावणे (20 गुण), 100 मीटर धावणे (15 गुण), गोळाफेक (15 गुण) असे एकूण 50 गुण तर महिला उमेदवार 800 मीटर धावणे (20 गुण). 100 मीटर धावणे (15 गुण), गोळाफेक (15 गुण) असे एकूण 50 गुण असणार आहेत. तसेच महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई (पुरूष) पदासाठीशारीरिक चाचणी एकूण 100 गुणांची होणार आहे. यामध्ये पुरुष उमेदवारासाठी 5 कि.मी. धावणे (50 गुण), 100 मीटर धावणे (25गुण), गोळाफेक (25 गुण) असे एकूण 100 गुण असणार आहेत. शारीरिक चाचणीमध्ये किमान 50 टक्के गुण मिळविणारे उमेदवार, संबंधित प्रवर्गामधील जाहिरात दिलेल्या रिक्त पदांच्या 1:10 या प्रमाणात 100 गुणांच्या लेखी चाचणीसाठी पात्र असतील.

अशी असेल लेखी परीक्षा

100 वस्तुनिष्ठ प्रश्नांसाठी लेखी परीक्षा घेतली जाईल जी 90 मिनिटांत पूर्ण करावी लागेल PST आणि PST फेरी 50 गुणांची असेल आणि पुढील निवड प्रक्रियेसाठी पात्र होण्यासाठी अर्जदारांनी परीक्षेत किमान 50% गुण मिळवणे आवश्यक आहे. लेखी चाचणीचा कालावधी ९० मिनिटांचा असेल व मराठी भाषेत घेण्यात येईल. सर्व प्रश्न बहुपर्यायी स्वरुपाचे राहतील. चुकीच्या उत्तरास गुण कपात करण्यात येणार नाहीत. परीक्षा मराठीतूनच होणार आहे. परीक्षेचा एकूण कालावधी 1:30 तासांचा आहे. त्यामध्ये 100 प्रश्न असतील ज्यात प्रत्येक बरोबर उत्तरासाठी 1 गुण दिला जाईल. पोलीस भारती 2022 च्या प्रश्नपत्रिकेत चार स्वतंत्र विभाग असतील.

विभाग नावएकूण प्रश्नएकूण गुणएकूण वेळ 
गणित25 प्रश्न25 गुण90 मिनिट
बौद्धिक चाचणी25 प्रश्न25 गुण
मराठी व्याकरण25 प्रश्न25 गुण
सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी25 प्रश्न25 गुण
एकूण100 प्रश्न100 गुण

 

गडचिरोली जिल्ह्याकरिता शासन, गृहविभाग आदेशनुसार गडचिरोली जिल्हयातील पोलीस भरतीमध्ये आवेदन सादर करणाऱ्या उमेदवाराला अतिरिक्त १०० गुणांची गोंडी आणि माडीया भाषेची लेखी चाचणी परीक्षा द्यावी लागेल. गडचिरोली जिल्हयामध्ये राहणाऱ्या उमेदवारांनाच गडचिरोली जिल्हा पोलीस भरतीमध्ये भाग घेता येईल. सदर उमेदवारांना प्रचलित नियमानुसार संबंधित तहसिलदार यांनी दिलेला वास्तव्याचा दाखला (Residential Certificate) जोडणे आवश्यक राहील. असे उमेदवार गडचिरोली जिल्हयाच्या बाहेर बदलीपात्र असणार नाहीत अशी माहिती अधिसूचनेनंत देण्यात आली आहे.

Total: 18331 जागा 

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र.पदाचे नाव पद संख्या
1पोलीस शिपाई14956
2चालक पोलीस शिपाई चालक2174
3राज्य राखीव पोलीस बल सशस्त्र पोलीस शिपाई (SRPF)1201
Total18331

युनिट नुसार रिक्त जागा:

अ. क्रयुनिटपद संख्या 
पोलीस शिपाईचालक पोलीस शिपाई चालक
1बृहन्मुंबई7076994
2ठाणे शहर52175
3पुणे शहर72010
4पिंपरी चिंचवड216
5मिरा भाईंदर986
6नागपूर शहर308121
7नवी मुंबई204
8अमरावती शहर2021
9सोलापूर शहर9873
10लोहमार्ग मुंबई620
11ठाणे ग्रामीण6848
12रायगड27206
13पालघर21105
14सिंधुदुर्ग9922
15रत्नागिरी131
16नाशिक ग्रामीण16415
17अहमदनगर12910
18धुळे42
19कोल्हापूर24
20पुणे ग्रामीण57990
21सातारा145
22सोलापूर ग्रामीण2628
23औरंगाबाद ग्रामीण39
24नांदेड15530
25परभणी75
26हिंगोली21
27नागपूर ग्रामीण13247
28भंडारा6156
29चंद्रपूर19481
30वर्धा9036
31गडचिरोली348160
32गोंदिया17222
33अमरावती ग्रामीण15641
34अकोला32739
35बुलढाणा51
36यवतमाळ24458
37लोहमार्ग पुणे124
38लोहमार्ग औरंगाबाद108
39औरंगाबाद शहर15
40लातूर29
41वाशिम14
42लोहमार्ग नागपूर28
राज्य राखीव पोलीस बल सशस्त्र पोलीस शिपाई (SRPF)
1पुणे SRPF 1119
2पुणे SRPF 246
3नागपूर SRPF 454
4दौंड SRPF 571
5धुळे SRPF 659
6दौंड SRPF 7110
7मुंबई SRPF 875
8सोलापूर  SRPF 1033
9गोंदिया SRPF 1540
10कोल्हापूर SRPF 1673
11काटोल नागपूर SRPF 18243
12कुसडगाव अहमदनगर SRPF 19278

शैक्षणिक पात्रता:

  1. पोलीस शिपाई: इयत्ता 12वी उत्तीर्ण.
  2. पोलीस शिपाई चालक: (i) इयत्ता 12वी उत्तीर्ण.  (ii) हलके वाहन चालक परवाना (LMV-TR)
  3. राज्य राखीव पोलीस बल सशस्त्र पोलीस शिपाई: इयत्ता 12वी उत्तीर्ण.

शारीरिक पात्रता: 

उंची/छाती पुरुषमहिला
उंची165 सेमी पेक्षा कमी नसावी (SRPF: 168 सेमी)158 सेमी पेक्षा कमी नसावी
छाती  न फुगवता 79 सेमीपेक्षा कमी नसावी

शारीरिक चाचणी: 

क्रिया पुरुष महिला गुण
पोलीस शिपाई
धावणी1600 मीटर800 मीटर20
100 मीटर100 मीटर15
गोळा फेक15
Total50 गुण
पोलीस शिपाई चालक
धावणी1600 मीटर800 मीटर30
गोळा फेक20
Total50 गुण
पोलीस शिपाई SRPF
धावणी05 कि.मी50
100 मीटर25
गोळा फेक25
Total100 गुण

वयाची अट: 30 नोव्हेंबर 2022रोजी,  [मागास प्रवर्ग:05 वर्षे सूट]

  1. पोलीस शिपाई: 18 ते 28 वर्षे.
  2. चालक पोलीस शिपाई: 19 ते 28 वर्षे.
  3. राज्य राखीव पोलीस बल सशस्त्र पोलीस शिपाई: 18 ते 25 वर्षे.

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

Fee: खुला प्रवर्ग: ₹450/-    [मागास प्रवर्ग: ₹350/-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 नोव्हेंबर 2022

अधिकृत वेबसाईट: पाहा

चालक पदांसाठी अशी होईल चाचणी

हलके मोटार वाहन चालविण्याची चाचणी 25 गुणांची असेल आणि जीप प्रकारातील वाहन चालविण्याची चाचणी 25 गुणांची अशी एकूण 50 गुणांची कौशल्य चाचणी द्यावी लागेल.

दोन्ही चाचण्यांमध्ये एकत्रित किमान 40 टक्के गुण मिळवून उमेदवारास उत्तीर्ण व्हावे लागेल.

कौशल्य चाचणी हो केवळ एक अहंता चाचणी असून कौशल्य चाचणीत मिळालेले गुण, गुणवत्ता यादी तयार करण्यासाठी विचारात घ्यावयाच्या एकूण गुणात समाविष्ट केले जाणार नाहीत.

कौशल्य चाचणीत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची 100 गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येईल.