50 हजार रुपये अनुदानाची (Subsidy) पहिली आणि दुसरी यादी जाहीर

125

मुंबई, :- 50 हजार रुपये अनुदानाची (Subsidy) पहिली आणि दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत तुमचं नाव आहे का? हे बघण्यासाठी राज्य शासनाच्या या संदर्भातील अधिकृत संकेतस्थळ https://mjpskyportal.maharashtra.gov.in/ ला भेट देऊन तुमचा मोबाईल नंबर तसेच इतर माहिती टाकून यादीमध्ये तुमचं नाव शोधू शकता.नियमितपणे पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदानाचा (Subsidy) लाभ म्हणून शासनाने 50 हजार रुपये मदत जाहीर केलेली होती. आणि ती बऱ्याच जिल्ह्यांमध्ये वाटप देखील करण्यात आलेली आहे. याची पहिली आणि दुसरी यादी देखील जाहीर करण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांना ही यादी पहायची असल्यास राज्य शासनाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन ऑनलाइन ही यादी पाहता येणार आहे. 2015 ते 2018 या काळामध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे शासनाकडून 50 पैसे पेक्षा कमी पैसेवारी जाहीर करण्यात आलेली होती. त्याचबरोबर महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजने अंतर्गत शासनाकडून मदत म्हणून पीक कर्ज तसेच नियमित कर्ज फेर करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये अनुदान देण्याचा शासनाकडून मोठा निर्णय घेण्यात आला. त्याचे वाटप देखील सुरू झालेले आहेत.