जेईई मेन २०२३ च्या पहिल्या सत्रासाठी नोंदणी प्रक्रिया १५ डिसेंबरपासून सुरू

83

नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (National Testing Agency, NTA) जेईई मेन २०२३ नोटिफिकेशन जाहीर केले आहे. अशा परिस्थितीत परीक्षेसाठी नोंदणी केव्हा होणार, कोणत्या तारखेला परीक्षा होणार, याची सर्व माहिती येथे उपलब्ध करून दिली जात आहे.एनटीएने जाहीर केलेल्या नोटीसनुसार, जेईई मेन परीक्षा २०२३ मध्ये दोन सत्रांमध्ये घेतली जाईल. ज्यामध्ये पहिले सत्र जानेवारी महिन्यात आणि दुसरे सत्र एप्रिल महिन्यात होईल.

नोंदणीला सुरुवात

जेईई मेन २०२३ च्या पहिल्या सत्रासाठी नोंदणी प्रक्रिया १५ डिसेंबरपासून सुरू झाली आहे. आणि ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख १२ जानेवारीपर्यंत असेल. तर परीक्षा २४,२५,२७,२८, २९,३० आणि ३१ जानेवारी २०२३ रोजी होणार आहे.

प्रवेशपत्र जानेवारीतच

याव्यतिरिक्त उमेदवारांसाठी जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात विद्यार्थ्यांच्या परीक्षेचे शहर जाहीर केले जाणार आहे. त्याचबरोबर तिसऱ्या आठवड्यापासून परीक्षेची प्रवेशपत्रे उपलब्ध करून दिली जातील. विद्यार्थी जेईई मेनच्या अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in वर जाऊन परीक्षेसाठी जारी केलेली संपूर्ण सूचना तपासू शकतात.

जेईई मेन परीक्षेत २ पेपर

जेईई मेन परीक्षेत २ पेपर असतील. ज्यामध्ये एनआयटी, आयआयटी आणि इतर संस्थांमधील बीई, बीटेक अभ्यासक्रमांना पहिल्या पेपरद्वारे प्रवेश दिला जातो. दुसरीकडे दुसऱ्या पेपरच्या माध्यमातून बी.आर्क आणि बी.प्लॅनिंगसारख्या अभ्यासक्रमांना प्रवेश दिला जातो.अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा