50 हजार रुपये अनुदानाची (Subsidy) 3 (तीसरी) यादी जाहीर,यादीमध्ये दिलेला विशिष्ट क्रमांक आणि आधार कार्ड घेऊन सीएससी सेंटरला भेट द्यावी

93

50 हजार रुपये अनुदानाची (Subsidy) (तीसरी) यादी जाहीर 23/12/2022

 यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत तुमचं नाव आहे का? हे बघण्यासाठी राज्य शासनाच्या या संदर्भातील अधिकृत संकेतस्थळ https://mjpskyportal.maharashtra.gov.in/ ला भेट देऊन तुमचा मोबाईल नंबर तसेच इतर माहिती टाकून यादीमध्ये तुमचं नाव शोधू शकता.नियमितपणे पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदानाचा (Subsidy) लाभ म्हणून शासनाने 50 हजार रुपये मदत जाहीर केलेली होती. आणि ती बऱ्याचदेखील करण्यात आलेली आहे.

याची पहिली आणि दुसरी यादी देखील जाहीर करण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांना ही यादी पहायची असल्यास राज्य शासनाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन ऑनलाइन ही यादी पाहता येणार आहे.

2015 ते 2018 या काळामध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे शासनाकडून 50 पैसे पेक्षा कमी पैसेवारी जाहीर करण्यात आलेली होती. त्याचबरोबर महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजने अंतर्गत शासनाकडून मदत म्हणून पीक कर्ज तसेच नियमित कर्ज फेर करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये अनुदान देण्याचा शासनाकडून मोठा निर्णय घेण्यात आला. त्याचे वाटप देखील सुरू झालेले आहेत.

ज्या शेतकरी बांधवांची नावे समाविष्ट असतील त्यांना देखील आधार प्रमाणीकरण करावे लागणार आहे. मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की, पन्नास हजार रुपये प्रोत्साहन पर अनुदानाच्या दुसऱ्या यादीत ज्या शेतकरी बांधवांची नावे समाविष्ट असतील त्यांना यादि मध्ये दिलेल्या विशिष्ट क्रमांकासह आधार प्रमाणीकरण करावे लागणार आहे. आधार प्रामाणिकरण करण्यासाठी शेतकरी बांधवांना यादीमध्ये दिलेला विशिष्ट क्रमांक आणि आधार कार्ड घेऊन सीएससी सेंटरला भेट द्यावी लागणार आहे.

मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की शासनाकडून जिल्हानिहाय प्रोत्साहन पर अनुदानाच्या पात्र शेतकरी बांधवांच्या याद्या महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केल्या जात आहेत.