जोडारी, संधाता, वीजतंत्री, वायरमन, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक ,शासकीय आयटीआयमध्ये होणार भरती मेळावा

89

 चंद्रपूर : शिकाऊ उमेदवारी योजनेंतर्गत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, चंद्रपूर येथील कौशल्यम सभागृहात १३ जानेवारी रोजी सकाळी १० वाजतापासून मेळावा होणार आहे. शिकाऊ उमेदवारी भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यामुळे जिल्ह्यातील बेरोजगारांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे.

या मेळाव्यासाठी टाटा ऑटो कॅम्प बॅटरी लिमिटेड, रांजणगाव (एमआयडीसी) पुणे या कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. शिकाऊ उमेदवारीकरिता निवड झालेल्या उमेदवारांना नियमानुसार दरमहा १२ हजार शंभर रुपयांचे विद्यावेतन आणि कंपनीतर्फे विविध – सोयी सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत.

प्रशिक्षणार्थ्यांनी जोडारी, संधाता, वीजतंत्री, वायरमन, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक यापैकी कुठल्याही व्यवसायाचे प्रशिक्षण पूर्ण केले असल्यास अशा उमेदवारांना एक वर्ष अप्रेंटिस प्रशिक्षण देण्याच्या दृष्टीने या भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी आधारकार्ड, पॅनकार्ड, टीसी, आयटीआय पास प्रमाणपत्र या मूळ प्रमाणपत्रांच्या झेरॉक्स प्रतींसह तसेच पासपोर्ट फोटो घेऊन शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कौशल्यम सभागृह, चंद्रपूर येथे उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेचे प्राचार्य रवींद्र मेहेंदळे, बी. टी. आर. आय. सेंटरच्या सहायक प्रशिक्षणार्थी सल्लागार प्रणाली दहाटे यांनी केले आहे.