गडचिरोली, 19 जानेवारी : गोंडवाना विद्यापीठाचा हिवाळी 2022 चा निकाल ऑनलाईन जाहीर करण्यात आला आहे. निकाल बघण्याकरिता https://gug.digitaluniversity.ac/Content.aspx?ID=29581 या लिंक च्या
आधारे आपला निकाल पाहता येणार आहे.
दोन वर्ष कोविड 19 मुळे परीक्षा ऑनलाईन घेण्यात आली होती. मात्र यंदा कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याने परीक्षा लेखी स्वरुपात घेण्यात आली. तब्बल दोन वर्षानंतर लेखी परीक्षा होत असल्याने काही विद्यार्थ्यांनी ऑनलाईन परीक्षा घेण्यात यावी अशी मागणी केली होती तर काहींनी ऑफलाईन लेखी स्वरुपात परीक्षा घेण्यात यावी अशी मागणी केली. त्यानंतर सुरुळीतपणे ऑफलाईन लेखी परीक्षा पार पडली. आता नुकताच हिवाळी 2022 परीक्षेचा निकाल ऑनलाईन रित्या जाहीर करण्यात आला आहे.