मुल येथील विरेंद्र मेश्राम छ. शिवाजी महाराज वनश्री पुरस्कारांने सन्मानित

87

श्री. विरेंद्र मेश्राम छ. शिवाजी महाराज वनश्री पुरस्कारांने सन्मानित
सामाजिक वनिकरणाच्या वन्नेत्तर क्षेत्रातील वृक्ष संवर्धन, संरक्षण, वृक्षारोपन, जनजागृती मध्ये भरीव कामगीरी केल्याबाबत मुल येथील पर्यावरण मित्र, स्वावलंबी प्रकल्प मुल संस्थेचे संचालक श्री. विरेंद्र मेश्राम यांचा प्रजासत्ताकदिनी महाराष्ट्र राज्याचे वने, सांस्कृतीक कार्य, मत्स्य व्यवसाय मंत्री तथा जिल्हयाचे पालक मंत्री मा. सुधीर मुनगटीवार यांच्या हस्ते छ. शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार देवून सन्मान करण्यात आले. पुरस्काराचे स्वरुप ३०,०००/-रु. चे बचत प्रमाणपत्र, स्मृती चिन्ह व प्रमाणपत्र होते. या कार्यक्रमास जिल्हाधिकारी विनय गौंडा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, पोलीस अधिक्षक रविद्रसिंग परदेसी, चंद्रपूर वनवृतताचे मुख्य वनसंरक्षक श्री. लोनकर, सामाजिक वनिकरण विभागाच्या विभागीय वनअधिकारी कु. एस. डी. चौहान, सामाजिक वनिकरण मुलचे वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव राजुरकर प्रामुख्याने उपस्थित होते.
श्री. विरेंद्र मेश्राम वनविभागासोबत मागील २५ वर्षापासून वनसंरक्षण, वन्यजीव संरक्षण, जैवविविधता व व्यसनमुक्ती क्षेत्रात कार्यरत असून त्यांना यापुर्वी शासनाच्या सामाजिक न्याय विभागाने राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती पुरस्कारानी गौरव केलेला आहे. जिल्यातील स्वंयसेवी संस्था विविध विभागाच्या अधिकारी, कर्मचारी, मित्र मंडळीनी त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केलेला आहे.