एक आठवडा प्रेमाचा आज ‘रोझ डे’

108

१४ फेब्रुवारीला येणाऱ्या व्हॅलेंटाइन डे आधी ‘एक आठवडा प्रेमाचा’ हा सप्ताहच साजरा करण्याचे फॅड गेली काही वर्षे सुरू आहे. या सप्ताहात पहिला येणारा दिवस म्हणजे रोझ डे. ७ फेब्रुवारीला प्रेमाचे आणि मैत्रीचे नाते जोडण्यासाठी या दिवशी गुलाब देऊन आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या जातात. मंगळवारी साजऱ्या होणाऱ्या रोझ डेच्या अनुषंगाने  फुलांचा बाजार वधारला आहे.  नानाविध रंगांच्या गुलाबफुलांच्या ऑनलाइन ऑर्डरदेखील नोंदविल्या गेल्या आहेत. गुलाबी, लाल, पिवळा, पांढऱ्या गुलाबांचा सुगंध अमरावतीच्या आसमंतात दरवळला
आहे.गुलाब हे प्रेमाचे प्रतीक आहे. त्यामुळेव्हेलेंटाइन वीकची  सुरुवात
‘रोझ डे’ने होते. लाल गुलाब प्रेमाचे प्रतीक, पिवळा गुलाबमैत्रीचे, पांढरागुलाब शुद्धतेचे
प्रतीक, गुलाबी गुलाब धन्यवाद म्हणण्यासाठी, आपल्याला आवडणारी व्यक्ती असल्यास जांभळा गुलाब, तुमचा साथीदार तुमच्यासोबत असल्याचा तुम्हाला गर्व असेल तर नारंगी गुलाब असे रंगांचे महत्त्व आहे. प्रेयसी, प्रियकराजवळ भावना व्यक्त करण्यासाठी लाल गुलाब द्या. आपल्या आप्तस्वकीयांची माफी मागायची असेल तर पांढरा गुलाब भेट द्या. प्रेमीयुगुल तर रोझ डेसाजराकरणारच आहेत;मात्र वेगळ्या पद्धतीने रोझ डे साजरा करण्याची प्रत्येकाला इच्छा असते. हा दिवस हटके बनविण्यासाठी पुष्पगुच्छ घरी पाठवून सरप्राइज द्या. मनमोहक ठिकाणी फिरायला जा. कल्पनेच्या पलीकडे जाऊन साजरा करा या वर्षीचा रोज डे !