मुल(प्रती)
अ.भा. मराठी पत्रकार परिषदेशी संलग्नित चंद्रपूर जिल्हा मराठी पत्रकार संघाशी संलग्नित मूल तालुका पत्रकार संघाच्या सर्वसाधारण सभेचे बुधवार दिनांक ०८/०२/२०२३ रोजी स्थानिक मूल तालुका पत्रकार संघाचे कार्यालयात एका विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेत मुल तालुका पत्रकार संघाची नवीन कार्यकारणी गठीत करण्यात आली.
विद्यमान अध्यक्ष अशोक येरमे प्रकृती अस्वस्थामुळे उपस्थित राहू शकले नाहीत. त्यामुळे उपाध्यक्ष रविंद्र बोकारे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या सभेत निवड प्रक्रीया पार पडली.
सभेत दैनिक लोकमतचे तालुका प्रतिनिधी राजू गेडाम यांची अध्यक्षपदी , तर सचिवपदी दैनिक सकाळ चे तालुका प्रतिनिधी विनायक रेकलवार आणि उपाध्यक्ष म्हणून दैनिक तरुण भारतचे तालुका प्रतिनिधी युवराज चावरे यांची आणि सहसचिव म्हणून राजोलीचे ग्रामीण प्रतिनिधी विजय पाकमोडे यांची अविरोध निवड करण्यात आली. सर्व नव नियुक्त पदाधिकारी यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आले.