रस्ता बंद केल्याने जुन्या वार्डतील नागरीक झाले त्रस्त,तक्रार करूनही होता हेत कानाडोळा

157

मुल:- शहरातील जुन्या वस्तीमधील राहणा-या व्यक्तीचा येजा करण्याचा रस्ताच बंद केल्याने जुन्या वार्डतील नागरीकांची मोठी अडचण झाली आहे. त्यांनी या समस्येतून सुटका व्हावी म्हणून नगरपरीषद मूल कार्यालयाचे दार ठोठावले ,परंतू कोणीही दखल घेतली नाही.
जुन्या वस्तीमधील पठाण यांचे घरासमोरील विश्राम गृहाजवळरील रोडलगात घर आहे. त्यांच्या घरा समोरून येजा करण्याकरीता 12 मीटरचा अधिकृत रस्ता आहे.परतु या रस्तावर काहींनी अनधिकृतरित्या वस्तू ठेवून विटा-मातीची,आजूबाजूला सागाचे झाड लावून हा रस्ताच बंद केला आहे. वारंवार निवेदन,उपोषण बसण्याचा ईशारही नगरपरीषद मूल ला दिले असता आज पर्यंत कानडोळा करीत आहेत त्यांनी कोणतीही कार्यवाही केलेली नाही.       आपली हद सोडून रस्त्यापर्यंत अतिक्रमण केल्यामुळे रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांना खुल्या प्लॉट वरून जावे लागत आहे…शहरातील मुख्य मार्गावर आणि विश्रामगृह बांधकाम विभागासमोरील असलेल्या भूखंड क्रमांक ९४९ आणि ९४८, ९३८, ९४७ दरम्यान रस्त्यावर अवैध विटमातीचे कुंपण  नगरपालिकेच्या  परवानगीशिवाय  बांधण्यात आली आहे. नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागतआहे. त्यामुळे सदर अतिक्रमण तत्काळहटविण्यात यावे, नगरपालिकेकडे अनेक वर्षांपासून अवैधरीत्या केलेल्या अतिक्रमणाची तक्रार केली होती. नगरपालिकेद्वारे अद्यापही ठोस कारवाई केलेली नाही.  मुख्याधिकाऱ्यांनी या प्रकाराची गंभीरतेने घेऊन अतिक्रमण हटविण्यात यावे,