शिष्यवृत्ती’ साठी करा ३१ मार्चपर्यंत अर्ज : बोंदर

77

पुणे, ता. 14: उच्च शिक्षण mahadbtmahait.gov.in’
संचालनालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध १४ शिष्यवृत्ती योजनांसाठी ३१ मार्चपर्यंत महाडीबीटी पोर्टलद्वारे ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावेत, असे आवाहन पुणे विभागाचे उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. किरणकुमार बोंदर यांनी केले आहे.
राज्य सरकारच्या महाडीबीटी पोर्टलद्वारे उच्च शिक्षण विभागाच्या १४ शिष्यवृत्ती योजनांची ऑनलाइनद्वारे अंमलबजावणी करण्यात येते. या शिष्यवृत्ती योजनांबाबत ‘https://
संकेतस्थळावर अधिक माहिती दिली आहे. त्यामध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना, डॉ. पंजाबराव देशमुख वसतीगृह निर्वाह भत्ता योजना, एकलव्य आर्थिक साहाय्य, गुणवान विद्यार्थ्यांना आर्थिक साहाय्य योजना (कनिष्ठ स्तर) व (वरिष्ठ स्तर), राज्य शासनाची दक्षिणा अधिछात्रवृत्ती, शासकीय संशोधन अधिछात्रवृत्ती, जवाहरलाल नेहरू विद्यापीठ शिष्यवृत्ती या योजनांचा समावेश आहे…