जातवैधता प्रमाणपत्र पडताळणीचे संकेतस्थळ गत महिना भरापासून बंद

99

राज्याच्या सामाजिकन्याय व विशेष सहाय्य विभागाचेजातवैधता प्रमाणपत्र पडताळणीचे
संकेतस्थळ गत महिनाभरापासून बंदआहे. त्यामुळे अनुसूचित जाती,ओबीसी, व्हीजेएनटी, मराठा,
‘एसबीसी प्रवर्गातील उमेदवारांना‘कास्ट व्हॅलिडिटी’साठी भटकंतीकरावी लागत आहे. चांद्यापासून तर
बांद्यापर्यंत हीच स्थिती असताना राज्य सरकारचे याकडे अक्षम्यदुर्लक्ष असल्याचे वास्तव आहे.
     ‘कास्ट व्हॅलिडिटी’संबंधित अर्जस्वीकारणे, पोचपावती देणे, वुटींचीपूर्तता करणे, जातवैधता प्रमाणपत्र
ऑनलाइन देणे ही कामे पुणे येथील(एका एजन्सीकडे सामाजिक न्याय वविशेष साहाय्य विभागाने सोपविलीआहेत. विद्यार्थी, नागरिक वा राजकीय व्यक्‍तींना ‘कास्टव्हॅलिडिटी’ मिळविणे सुकर व्हावे,
यासाठी ऑनलाइन _ प्रक्रियाराबविण्याचा निर्णय घेण्यात आला.मात्र,  महिनाभरापासून‘कास्ट व्हॅलिडिटी’चे संकेतस्थळबंद असताना पुणे येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व
प्रशिक्षण संस्थेकडून (बार्टी)कोणत्याही प्रकारची दखल घेण्यातआली नाही, याबाबत आश्‍चर्य व्यक्‍त
केले जात आहे. सामाजिक _ न्यायविभागाच्या ‘कास्ट व्हॅलिडिटी*विभागात उमेदवार आणि पालकयेरझारा मारून थकून गेले आहेत.ऑनलाइन कामकाज बंदअसताना ऑफलाइनची सुविधा
नाही, हे विशेष.